एका महिला कर्मचाऱ्याला खोटं बोलून सुट्टी घेण्याच्या आरोपात नोकरीहून काढण्यात आलं आहे. तिने पाठदुखीचं कारण सांगत सुट्टी घेतली होती. पण सुट्टी घेऊन ती डान्स व्हिडीओ बनवत होती. तिने तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले, जे तिच्या बॉसने पाहिले आणि त्यावर अॅक्शन घेतली. ही घटना स्पेनची आहे.
स्पॅनिश न्यूजपेपर La Vanguardia नुसार, या महिलेचं नाव पायडॅड आहे. ती सेमार्क एसी ग्रुप नावाच्या कंपनीत 2006 पासून कॅशिअरचं काम करत होती. गेल्यावर्षी तिने ऑफिसमध्ये पाठदुखीचं कारण सांगितलं आणि साधारण 8 महिने पेड सुट्टीवर गेली. पण या दरम्यान पायडॅड टिकटॉक वर तिचे डान्स व्हिडीओ शेअर करत होती.
महिलेचे हे डान्स व्हिडीओ तिच्या बॉसने पाहिले, ज्यानंतर महिला अडचणीत आली. बॉसने तिला नोकरीहून काढून टाकलं. या विरोधात पायडॅड लेबर कोर्टात गेली, पण तिथे तिच्या हाती निराशा लागली. कोर्टाने कंपनीचा निर्णय योग्य ठरवला. पायडॅडकडे सुप्रीम कोर्टात जाण्याचा चान्स आहे.
रिपोर्टनुसार, पायडॅडने कंपनीत पेड लीवचं कारण सांगितलं की, तिची पाठ खूप दुखत आहे आणि त्यामुळे ती ऑफिसला येऊ शकत नाही. पण हा केवळ एक बहाना होता. कारण सुट्टीत आराम करण्याऐवजी ती टिकटॉकवर डान्स आणि फिरण्याचे व्हिडीओ शेअर करत होती.