एका कंपनीतील महिला कर्मचारी तिच्या दोन सहकाऱ्यांसोबत लंचब्रेक घेऊन जेवायला गेली होती. मात्र हे व्यवस्थापकीय संचालकाला न पटल्याने त्यांनी थेट तिला कामावरुन काढून टाकले होते. सदर प्रकरणाची सुनावणी रोजगार न्यायधिकरणात झाली. यानंतर कंपनीला सदर महिलेला १२ लाख रुपयांची भरपाई द्यावी लागली.
अहवालानुसार, ट्रेसी शेअरवूड ही महिला कर्मचारी ब्रिटनमधील वेस्ट मिडलँड्स येथील 'लीन एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट' येथे कार्यरत होती. ती दोन सहकाऱ्यांसोबत जेवायला गेली होती. त्यामुळे व्यवस्थापकीय संचालक मॅक्सिन जोन्स संतापले. ट्रेसी शेरवूडला कंपनीतून काढून टाकण्यात आले.
कंपनीच्या या निर्णयानंतर ट्रेसी नाराज झाली आणि तिने तक्रार दाखल केली. ट्रेसी आपल्या कामाप्रती प्रामाणिक नव्हती. त्यामुळे तिला काढून टाकल्याचं कंपनीने सांगितलं मात्र कंपनीने जे काही आरोप केले आहेत ते न पटणारे आहेत. त्यामुळे ट्रेसीला नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचे न्यायाधिकरणाने म्हटले आहे. या प्रकरणाचा निर्णय कर्मचारी ट्रेसीच्या बाजूने आला. तसेच तिला अयोग्य बडतर्फीमुळे १२ लाख रुपयांची भरपाई मिळाली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"