एका महिलेने पेट्रोल पंपच्या वॉशरूममध्ये एका बाळाला जन्म दिला आणि त्याला न घेताच तिथून फरार झाली. ही घटना अमेरिकेच्या टेक्सासमधील आहे. पोलिसांनी एक सीसीटीव्ही फुटेज जारी केला आहे. ती एप्रिल महिन्यात इथे आली होती आणि बाळाला तशीच सोडून फरार झाली. पोलिसांना वाटतं की, सीसीटीव्हीमध्ये दिसणारी महिलाच तिची आई आहे.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, बाळाला सकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी एका कस्टमरने पाहिलं होतं. डॉक्टर येईपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. महिला बघायला 20 वर्षापेक्षा जास्त वयाची दिसत आहे. यात दिसतं की, महिला इथे आली आणि काही वेळाचे निघून गेली.
पोलिसांनी सांगितलं की, हीच महिला बाळाची आई असू शकते. पण बाळासोबत तिच्या नात्याचा काहीच पुरावा सापडला नाही. पोलीस म्हमाले की, महिलेने साधारण 15 मिनिटे वॉशरूमचा वापर केला होता आणि एक तासानंतर तिथे बाळ सापडलं. ह्यूस्टनचे डिटेक्टिव सेलेब ब्राउनिंग म्हणाले की, त्या वॉशरूमच्या आत दुसरं कुणीच गेलं नव्हतं आणि ती आत जाण्याआधी तिथे बाळ नव्हतं.
ह्यूस्टन पोलिसांनी सांगितलं की, डिटेक्टिवला अजून हे समजलं नाही की, बाळ मृत जन्माला आलं की, जन्मानंतर त्याचा मृत्यू झाला. टीम अजूनही त्याच्या मृत्यूचं कारण शोधत आहेत.