आज ऑनलाइन डेटींग फारच कॉमन झाली आहे. लोक सोशल मीडियावर किंवा डेटींग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनोळखी लोकांना भेटतात आणि त्यांच्याशी मैत्री करतात. नंतर हळूहळू त्यांचं नातं आणखी मजबूत होतं आणि मग ते एकमेकांसोबत लग्न करतात. तसं तर हे सगळं ऐकायला सोपं वाटतं. पण ऑनलाइन डेटींगमध्ये फसवणूकही मोठी होते. इंग्लंडच्या एका महिलेला ऑनलाइन डेटींग इतकं महागात पडलं की, तिचं जीवन उद्ध्वस्त होता होता राहिलं. तिला आलेल्या या अनुभवावर ती पुस्तक लिहिण्याच्या विचारात आहे.
इंग्लंडची राहणारी रूथ टुनिक्लिफ ६१ वर्षीय आहे आणि आपल्या जीवनाशी फारच दुखद अनुभवावर पुस्तक लिहिणार आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, त्यांनी त्यांचा ऑनलाइन डेटींग अॅपचा अनुभव शेअर केला. २०१० मध्ये रूथने सांगितलं की, जेव्हा ती ५० वर्षांची होती, तेव्हा तिचा घटस्फोट होत होता. तिला तीन मुलं होती आणि घटस्फोट घेणं फारच वेदनादायी होतं.
यादरम्यान फेसबुकव पीटर मॅकमोहन नावाच्या व्यक्तीसोबत ती संपर्कात आली आणि त्याच्यासोबत बोलणं सुरू केलं. पीटर अमेरिकेत राहणारा होता आणि त्याने रूथला स्वप्न दाखवली की, तो रूथसोबत नवं जीवन सुरू करेल. तसेच अमेरिकेत आपला बिझनेस सुरू करेल. पीटरने असाही विश्वास दिला होता की, तो रूथच्या मोठ्या मुलीला मॉडलिंगचा कॉन्ट्रॅक्ट मिळवून देणार. नंतर ते फोनवर बोलू लागले.
पीटरला भेटायला अमेरिकेला गेली रूथ
पीटरने रूथला अमेरिकेतील नॅशविले इथे येण्यास सांगितलं. रूथ पीटरच्या प्रेमात बुडाली होती. १६ फेब्रुवारी २०११ ला १० दिवसांनंतर रिटर्न तिकीट करून अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला दोघांचं सगळं काही ठीक होतं. पीटरने तिची भेट त्याच्या ओळखीच्या लोकांशी करून दिली. पण तो प्रत्येक ठिकाणी रूथच्याच पैशांचाच वापर करत होता. रिपोर्टनुसार, हॉटेल बुक करणे किंवा इतर कामांसाठी रूथ त्याला पैसे देत होती. पण ज्या दिवशी रूथला अमेरिकेला परत जायचं होतं त्या दिवशी तिचा पासपोर्ट हरवला. पण न सापडल्याने तिला अमेरिकेतच थांबावं लागलं होतं. पण तोपर्यंत ती पीटरच्या प्रेमात हरवली होती. तिला पीटरवर संशय आला नाही.
अमेरिकेत अनेक महिने अडकून पडली रूथ
एक वेळ अशीही आली की, रूथचे पैसे संपत आले होते. हळूहळू पीटर तिच्याशी विचित्र वागू लागला होता. जेव्हा तिचे सेव्हिंगचे सगळे पैसे संपले तर पीटरने तिच्यासोबत जोर-जबरदस्ती करणं सुरू केलं आणि अनेकदा तर त्याने रूथचा गळाही दाबला. पीटरचा राग रूथवर निघू लागला होता आणि तिला मारतही होता. दोघांनी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी एका बारमध्ये काम सुरू केलं होतं.
आता तिला अमेरिकेत राहून बरेच दिवस झाले होते. तेव्हा तिने निर्णय घेतला की, आता ती पीटरसोबत राहणार नाही. तिने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. एक दिवस ती कार पार्किंगमधून पळून जाऊन पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिने सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. फेब्रुवारीत अमेरिकेत गेलेली रूथ ऑक्टोबरमध्ये ब्रिटनमद्ये परत आली. २०१६ मध्ये पोलिसांनी पीटरल अटक केली. रूथने सांगितलं की पीटरने तिची २० लाख रूपयांना फसवणूक केली. रूथ आता महिलांना ऑनलाइन डेटींगच्या नुकसानाबाबत जागरूक करते. लवकरच तिचं यावरचं पुस्तक येणार आहे.