अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये स्वत:च्या सुरक्षेसाठी लावलेल्या कॅमेरात महिलेची हत्या कैद झाली आहे. प्रियकराने पैशांसाठी तिची निर्दयीपणे हत्या केली. २०१६ मध्ये घडलेल्या या घटनेसाठी आरोपीला भलेही कोर्टाने शिक्षा दिली असेल, पण महिलेचे कुटुंबिय आजही या गोष्टीसाठी नाराज आहे की, सिस्टम तिला वाचण्यात अपयशी ठरलं.
कॅलिफोर्नियाच्या हंटिंग्टन बीचवर २०१६ मध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. इथे राहणारी ५० वर्षीय मॅरीलूची तिचा प्रियकर जेसन बेचरने निर्दयीपणे मारून आणि गळा दाबून हत्या केली होती. याप्रकरणी कोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान आरोपी बेचरला शिक्षा झाली पण मॅरीलूचा परिवार आजही दु:खी आहे.
मिररच्या रिपोर्टनुसार, मॅरीलू आणि बेचर यांच्या प्रेमसंबंध होते. पण पाच वर्षाच्या नात्यात नंतर त्यांचे संबंध फार बिघडले होते. त्यांच्यात पैशांवरून वाद वाढत होते. २८ ऑगस्ट २०१६ ला मॅरीलूने पोलिसांना फोनवर सांगितलं होतं की बेचरने तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर बेचरने मॅरीलूची माफी मागितली आणि म्हणाला की, त्याला तिच्यासोबत म्हातारपण घालवायचं आहे. जीवनभर तिची काळजी घ्यायची आहे. प्रियकराने माफी मागितल्यावर मॅरीलू त्याच्यासोबत राहू लागली. (हे पण वाचा : ती आई होती म्हणुनी! घरी झोपलेल्या बाळाचा गुदमरत होता श्वास, ऑफिसमध्ये बसलेल्या आईने वाचला त्याचा जीव)
पण मॅरीलूच्या मित्रांना आणि परिवाराला हे माहीत होतं की, त्यांच्या नात्यात फार कटुता आली आहे. हे नातं फार काळ टिकणार नाही आणि तेच झालं. आरोप होता की, बेचरने तिला पुन्हा दगा देत ड्रग्ससाठी पैसे चोरी केले. ज्यानंतर मॅरीलूने त्याला ब्लॉक केलं. मॅरीलूच्या लक्षात आलं होतं की, तिच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे तिने स्वत:च्या सुरक्षेसाठी १ डिसेंबर २०१६ ला आपल्या घरात कॅमेरे लावले. कॅमेरे लावल्यावर एका तासात मॅरीलूची हत्या करण्यात आली आणि तिची हत्या कॅमेरात कैद झाली.
ज्यात दाखवण्यात आलं की, बेचर घराबाहेर रात्री ११ वाजेपर्यंत वाट बघत होता. त्याने घरात शिरण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ते जमलं नाही. तो बरीच वर्ष मॅरीलूसोबत होता. त्यामुळे त्याला तिच्या शेड्यूलबाबत माहीत होतं. त्याने रात्री १२.१५ वाजता घरात एन्ट्री घेतली. त्यावेळी रोज कुत्र्याच्या एन्ट्रीसाठी दरवाजा उघडतो.
त्यानंतर त्याने घरात घुसून मॅरीलूनवर हिंसक हल्ला केला. तिला अनेक फ्रॅक्चर आले आणि नाकही तुटलं. पोलिसांना याचेही पुरावे मिळाले की, तिचा गळाही दाबण्यात आला होता. जेव्हा पोलिसांनी कॅमेरा फुटेज चेक केलं तेव्हा त्यांना बेचर सुरक्षा व्यवस्थेचा बॉक्स बघताना दिसला. नव्या सुरक्षा यंत्रणेला पाहून तो खिल्ली उडवतानाही दिसला. जवळपास ३० मिनिटांनंतर बेचर कचऱ्याची बॅग घेऊन घराबाहेर जाताना दिसला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. कोर्टाने त्याला दोषी ठरवत शिक्षाही सुनावली.
मॅरीलूच्या परिवारातील लोक बेचरला मिळालेल्या शिक्षेतून आनंदी नाहीत. ते निराश यावरून होते की, पोलिसांकडे बेचरची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर मॅरीलूचा जीव वाचू शकला नाही. ते म्हणाले की, दु:ख या गोष्टीचं आहे की, मॅरीलूने स्वत:ला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. पण जे कॅमेरा तिला सुरक्षित ठेवणार होते, ते तिच्या दु:खद अंतिम क्षणांनाच कैद करू शकले.