लंडन - 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला आपल्यासोबत सेक्स करण्यासाठी जबरदस्ती करणा-या महिलेल्या 15 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ब्रिटनच्या मॅनचेस्टरमधील ही घटना आहे. मॅनचेस्टर क्राऊन न्यायालयाने निर्णय सुनावताना महिलेचं हे कृत्य अत्यंत भयंकर दृष्ट असल्याचं म्हटलं आहे. 36 वर्षीय डॉन डेव्हिस यांच्यावर आरोप होता की, त्यांनी पीडित मुलाचा अनेकदा छळ केला असून, आपल्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्याच्यावर जबरदस्ती केली.
डॉन डेव्हिसला 2015 मध्ये पोलिसांनी अटक केली होती. जवळपास सव्वा दोन वर्षानंतर न्यायालयाने 12 वेळा सुनावणी घेतल्यानंतर आपला निर्णय सुनावला आहे. न्यायालयाने डेव्हिसल एका अल्पवयीन मुलाचं लैंगिक आणि शारीरिक शोषण केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवत 15 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
याप्रकरणी तपास करत असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने न्यायालयाच्या निर्णयानंतर आनंद व्यक्त करताना, डेव्हिसने पीडित मुलाचा अत्यंत वाईटपणे छळ केल्याचं सांगितलं आहे. आपल्याला मिळणा-या आनंदासाठी त्या मुलाला काय यातना होत आहेत याचा साधा विचारही तिने केला नसल्याचं अधिका-याने सांगितलं आहे.
आपल्याच चार विद्यार्थ्यांसोबत सेक्स, शिक्षिकेला होऊ शकते 40 वर्षांच्या कारावासाची शिक्षाअमेरिकेतील आरकन्सॉ येथे एका महिला शिक्षिकेवर आपल्याच चार विद्यार्थ्यांसोबत सेक्स केल्याचा आरोप असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने एकाच दिवशी दोन विद्यार्थ्यांसोबत आपल्या घरी शारिरीक संबंध ठेवले होते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आर्ट शिक्षिका जेसी लॉनेव्ह गोलाइन यांच्यावर जानेवारी ते एप्रिल 2016 दरम्यान आपल्या विद्यार्थ्यांसोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे.
फिर्यादी पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, जेसी लॉनेव्ह गोलाइन यांच्यावर सुरुवातील फक्त एक गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानुसार जेसी लॉनेव्ह गोलाइन यांनी एका अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत शारिरीक संबंध ठेवले होते. पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर जेसी लॉनेव्ह गोलाइन यांच्याविरोधातील चौकशीला सुरुवात झाली. जेसी लॉनेव्ह गोलाइन यांनी अनेक विद्यार्थ्यांसोबत शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला होता. जेसी लॉनेव्ह गोलाइन यांनीदेखील शाळा प्रशासनासमोर चार विद्यार्थ्यांसोबत शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप मान्य केला आहे. दोषी आढळल्या तर जेसी लॉनेव्ह गोलाइन यांना 40 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.