इंडोनेशियामध्ये (Indonesia) एका विवाहित महिलेला पर पुरूषासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची कठोर शिक्षा देण्यात आली. महिलेला सर्व लोकांसमोर चाबकाचे इतके फटके मारले की, ती जागेवर बेशुद्ध झाली. पण तरीही शिक्षा पूर्ण होईपर्यंत तिला मारण्यात आलं. हे सगळं पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालं.
शरिया कायद्यानुसार शिक्षा
'डेली स्टार' मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, इंडोनेशियाच्या बांदा आचेह शहरात (Banda Aceh City, Indonesia) एका विवाहित महिलेने दुसऱ्या पुरूषासोबत शारीरिक संबंध ठेवले. याची तिला क्रूर शिक्षा देण्यात आली. इतकंच नाही तर महिलेच्या पार्टनरलाही चाबकाचे फटके मारण्यात आले. शरिया कायद्यानुसार देण्यात आलेल्या या शिक्षेवेळी पोलीस अधिकारीही उपस्थित होते.
१७ चाबकाचे फटके
शिक्षा देण्याआधी महिलेला पांढऱ्या रंगाा इस्लामिक ड्रेस घालून देण्यात आला. यानंतर तिला जमिनीवर बसण्यास सांगण्यात आले आणि एका दुसऱ्या महिलेने तिला पाठीवर एकापाठी एक १७ चाबकाचे फटके मारले. यादरम्यान पीडित महिला ओरडत राहिली, पण तिचा मदत कुणी केली नाही. वेदनेमुळे महिला काही वेळासाठी बेशुद्ध झाली होती.
आचेह इंडोनेशियातील एकमेव असा प्रांत आहे जिथे शरिया कायद्याचं पालन होतं. या कायद्यात पर पुरूषासोबत संबंध ठेवणं आणि समलैंगिकतेसाठी क्रूर शिक्षा दिली जाते. समलैंगिकतेत दोषी आढळणाऱ्याला सार्वजनिकपणे १५० चाबकाचे फकटे मारले जातात. अनेकदा लोक शिक्षा पूर्ण होण्याआधीच हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. २०१८ मध्ये स्थानिक सरकारने सांगितलं होतं की, ते सार्वजनिकपणे शिक्षा देण्याची प्रथा बंद करतील. पण आजपर्यंत असं झालं नाही.
शुद्धीवर आणलं आणि पुन्हा मारलं...
याचवर्षी जूनमध्य एका पुरूषाला क्रूर शिक्षेचा सामना करावा लागला होता. त्याच्यावर विवाहाआधी लैंगिक संबंधाचा आरोप होता. त्याला शरिया कायद्यानुसार शिक्षा देण्यात आली. त्याला सार्वजनिकपणे चाबकाचे १०० फटके मारण्यात आले होते. शिक्षा पूर्ण होण्याआधीच तो बेशुद्ध झाला होता. पण त्यानंतरही त्याला शुद्धीवर आणून फटके मारण्यात आले.