शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

तालिबानचे अजब 'फर्मान', आता महिलांकडून 'हे' अधिकार हिरावून घेतले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 5:16 PM

Taliban Order : अफगाणिस्तानच्या एरियाना अफगाण एअरलाइन आणि काम एअरच्या दोन अधिकाऱ्यांनी रविवारी उशिरा सांगितले की, तालिबानने त्यांना महिलांना पुरुष नातेवाईकाशिवाय प्रवास करू न देण्याचे आदेश दिले आहेत.

काबूल : अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून तालिबानने महिलांसाठी अनेक तुघलकी आदेश जारी केले आहेत. आता तालिबानने महिलांचे विमान प्रवासाचे स्वातंत्र्यही हिरावून घेतले आहे. अफगाणिस्तानमधील विमान कंपन्यांना महिलांना पुरुष नातेवाईक असतील तरच विमानात बसण्याची परवानगी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानच्या एरियाना अफगाण एअरलाइन आणि काम एअरच्या दोन अधिकाऱ्यांनी रविवारी उशिरा सांगितले की, तालिबानने त्यांना महिलांना पुरुष नातेवाईकाशिवाय प्रवास करू न देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर एएफपीला सांगितले की, तालिबानचे प्रतिनिधी, दोन विमान कंपन्या आणि विमानतळ इमिग्रेशन अधिकारी यांच्यात गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

तालिबान सत्तेवर आल्यानंतर महिलांच्या स्वातंत्र्यावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. या निर्णयाबाबत अफगाणिस्तानच्या संबंधित मंत्रालयाला विचारले असता त्यांनी सांगितले की, महिलांना एकट्याने विमान प्रवास करण्यास बंदी घालणारे कोणतेही निर्देश जारी केलेले नाहीत. त्याच वेळी, तालिबानशी झालेल्या बैठकीनंतर, एरियाना अफगाणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने या आदेशाबद्दल एअरलाइनच्या कर्मचाऱ्यांना पत्र जारी केले. 

एएफपीने तालिबानच्या या पत्राचा हवाला देत तालिबानच्या आदेशाला दुजोरा दिला आहे. "कोणत्याही महिलेला पुरुष नातेवाईकाशिवाय कोणत्याही देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये प्रवास करण्याची परवानगी नाही," असे पत्रात म्हटले आहे. एएफपीच्या म्हणण्यानुसार, दोन ट्रॅव्हल एजंटांनी देखील पुष्टी केली की त्यांनी एकल महिला प्रवाशांना तिकीट देणे बंद केले आहे.

महिलांना विमानात चढण्याची परवानगी नव्हती"काही महिला ज्या पुरुष नातेवाईकाशिवाय प्रवास करत होत्या त्यांना शुक्रवारी काबुल-इस्लामाबाद काम एअर फ्लाइटमध्ये चढण्याची परवानगी नव्हती", असे फ्लाइटमधील एका प्रवाशाने एएफपीला सांगितले. तर आणखी एका सूत्राने सांगितले की, अमेरिकेचा पासपोर्ट असलेल्या अफगाण महिलेला शुक्रवारी दुबईला जाण्यासाठी विमानात बसण्याची परवानगी नाकारण्यात आली. दरम्यान, तालिबानमधील महिलांना बहुतांश सरकारी नोकऱ्या आणि माध्यमिक शालेय शिक्षणातून बाहेर करण्यात आले आहे. यासोबतच कुराणच्या काटेकोर व्याख्येनुसार कपडे घालण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान