बीजिंग- चीनमधील एका रुग्णालयामध्ये धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या घटनेमुळे रुग्णावर उपचार करणारे डॉक्टरही चक्रावून गेले आहेत.चीनच्या जिआंगसू प्रांतातील चांगझो शहरामधील वुजीन रुग्णालयामध्ये एका महिलेला उपचारासाठी भरती करण्यात आले होते. ही महिला 56 वर्षांची असून पाठ दुखत असल्यामुळे ती दाखल झाली होती. तिच्या पोटाची तपासणी करता त्यामध्ये जवळपास 3000 मूतखडे असल्याचे लक्षात आले. या निरीक्षणामुळे डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. या महिलेचे केवळ आडनाव झँग असल्याचे समजले आहे. गेल्या आठवड्यामध्ये पाठीच्या दुखण्याचे निमित्त होऊन तिने डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तपासणीनंतर पुढील सर्व धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.तिच्यावर शस्त्रक्रीया करुन 2,980 खडे बाहेर काढण्यात आले आहेत. नजिकच्या इतिहासात इतक्या संख्य़ेने मुतखडे एकाच रुग्णाच्या पोटातून काढण्याची ही एकमेव वेळ असावी. महाराष्ट्रातील धनराज वाडिले यांच्या पोटातून 1 लाख 72 हजार 155 मूतखडे काढण्यात आले होते. त्यांचे नव गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे.
बापरे! पाठदुखीची तक्रार घेऊन आलेल्या महिलेच्या पोटातून काढले 3000 मुतखडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 2:32 PM