लंडन :
पुरुषांच्या तुलनेत महिलांचे डाेके जास्त गरम असते. लंडनच्या संशाेधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. मात्र, हा राग किंवा स्वभावाच्या बाबतीत नसून, मेंदूच्या तापमानासंबंधी आहे. महिलांच्या मेंदूचे तापमान सुमारे अर्धा अंश सेल्सिअस एवढे अधिक असल्याचे संशाेधकांना आढळून आले आहे.
केम्ब्रिजच्या ‘एमआरसी लेबाॅरेटरी फाॅर माॅलिक्युलर बायाेलाॅजी’ या संस्थेने यासंदर्भात एक संशाेधन केले. त्यानुसार तापमानाबाबत चकित करणारी माहिती समाेर आली आहे. सर्वसाधारणत: शरीरातील इतर भागाचे तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत राहते, तर मेंदूचे सरासरी तापमान ३८.५ अंश सेल्सिअस एवढे असते. मात्र, मेंदूच्या आतील भागाचे तापमान ४० अंश सेल्सिअस एवढे राहते. डाेक्याला दुखापत झालेल्या रुग्णांच्या बाबतीतही असे हाेण्याची शक्यता आहे. रात्रीच्या तुलनेत दिवसा महिलांच्या डाेक्याचे तापमान जास्त राहते. ते ४० अंश सेल्सिअसपर्यंतही जाऊ शकते, असे संशाेधकांचे म्हणणे आहे.मासिक पाळीचा परिणाम तापमान अधिक असण्यामागे मासिक पाळीचे कारण आढळल्याचे संशाेधनामध्ये सहभागी असलेले डाॅ. जाॅन ओ’नील यांनी सांगितले. मेंदूचे तापमान अनेकदा खूप वाढते. शरीराचे तापमान एवढे वाढल्यास अंगात ताप असल्याची नाेंद हाेते.वाढत्या वयामुळे वाढते तापमानसंशाेधकांचे म्हणणे आहे की, वाढत्या वयानुसार मेंदूला थंड करण्याची क्षमता कमी हाेते. त्यामुळे वयानुसार मेंदूचे तापमान वाढत जाते. यावर अधिक संशाेधनाची गरज आहे.