Crime News : पुरूष टॅक्सी ड्रायव्हरच्या लैंगिक शोषणाप्रकरणी एका महिलेला कोर्टाने दोषी ठरवलं आहे. सुनावणी दरम्यान महिलेला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. महिलेवर असाही आरोप लावण्यात आला होता की, टॅक्सीमधून प्रवासादरम्यान तिने टॅक्सी ड्रायव्हरसोबत शारीरिक संबंध ठेवले.याआधीही महिलेवर लैंगिक शोषणाचे आरोप लागले होते. 2 वर्षाआधी एका कंडक्टरच्या लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तिला ट्रेनमधून उतरून देण्यात आलं होतं. सांगितलं गेलं की, त्यावेळी ती नशेत होती.
दोषी ठरवण्यात आलेल्या महिलेचं नाव आयरीन टोरी आहे. ती स्कॉटलॅंडच्या डूंडीमध्ये राहणारी आहे. मे 2020 मध्ये ती एका टॅक्सीने घरी जात होती. ती मागच्या सीटवर बसली होती. पण चालत्या गाडीत ती मागच्या सीटवरून समोरच्या सीटवर आली आणि तिने ड्रायव्हरचं लैंगिक शोषण केलं.
42 वर्षीय टोरीने टॅक्सी ड्रायव्हरला शारीरिक संबंध ठेवण्या बदल्यात पैसेही ऑफर केले. टोरीने हे स्वत: मान्य केलं की, ती ड्रायव्हरसोबत संबंध ठेवण्यासाठी फोर्स करत नव्हती. याप्रकरणी सुनावणी करताना कोर्टाने तिला दोषी ठरवलं. पण कोर्टाने अजून तिच्या शिक्षेची सुनावणी केली नाही.टोरी आधीपासून सेक्स ऑफेंडर्सच्या लिस्टमध्ये आहे. तिच्याविरोधात ही कारवाई ती पोलिसासमोर नग्न झाल्यानंतर करण्यात आली होती. ते 2019 मध्ये तिने दारू पिऊन एका ट्रेनच्या कंडक्टरसोबत गैरवर्तन केलं होतं.
प्रोसिक्यूटर लोरा अपोस्टोलोवाने कोर्टात सांगितलं की, ती मागच्या सीटवर बसली होती. प्रवासादरम्यान तिने ड्रायव्हरला काही प्रश्न विचारले. तिने ड्रायव्हरला विचारलं की, तू विवाहित आहेस का? आणि तो त्याच्या पत्नीला दगा देऊ शकतो का?
लोरा अपोस्टोलोवाने पुढे सांगितलं की, यानंतर ती चालत्या गाडीत समोरच्या सीटवर येऊन बसली. मग ड्रायव्हरने गाडी थांबवली. त्यानंतर तिने ड्रायव्हरचं लैंगिक शोषण केलं.