वेलिंग्टन : न्यूझीलंडमध्ये ग्रीन पार्टीच्या खासदार गोलरिज घरमन यांच्यावर दोन शॉपिंग स्टोअरमधून तीन वेळा कपडे चोरल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. घरमन यांच्या कपडे चोरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गोलरिज म्हणाल्या की, कामाच्या तणावाने मला त्रास झाला आणि त्यातून हे घडले आहे. मात्र यामुळे मी माझ्या लोकांना मान खाली घालायला लावली, असे मला वाटत असल्याने मी माफी मागत खासदारकीचा राजीनामा देते.
ऑकलंड आणि वेलिंग्टनमधील स्टोअरमधून कपडे चोरल्याचा गोलरिज यांच्यावर आरोप आहे. पोलिसांनी या दुकानांचे व्हिडीओ फुटेज मिळवले आहे. आता गोलरिज यांची चौकशी करण्यात येत आहे. ४२ वर्षीय गोलरिज यांचे कुटुंब सुमारे ३० वर्षांपूर्वी इराणमधून पळून न्यूझीलंडमध्ये आले होते. गोलरिज यांनी मानवाधिकारांच्या मुद्द्यांवर खूप काम केले आहे.