बगदाद : इराकमधील सुन्नी बंडखोरांनी अंबर प्रांतातील चार महत्त्वाची शहरे ताब्यात घेतली आहेत. शुक्रवारपासून चाललेल्या या कारवाईत रुतबा हे शहर शनिवारी रात्री ताब्यात घेण्यात आले आहे. इराकच्या तेल रिफायनरीवर ताबा मिळविल्यानंतर आयएसआयएस दहशतवादी बैजी गावात फिरत असून, घरोघर जाऊन स्त्रियांचा शोध घेत आहेत. प्रत्येक घरात किती स्त्रिया आहेत, त्यापैकी विवाहित किती व अविवाहित किती याची माहिती जाणून घेतली जात आहे. बहुतांश दहशतवादी अविवाहित आहेत. इराकमध्ये नागरिकांना ओळखपत्रे दिली जातात व त्यावर विवाहित, अविवाहित हा उल्लेख असतो. (वृत्तसंस्था)
इराकी बंडखोर शोध घेतायत स्त्रियांचा
By admin | Published: June 23, 2014 5:01 AM