नाझीचे सैन्य देखील या रशियनांपेक्षा नीच नव्हते, अशा शब्दांत रशियन फौजांचा समाचार घेणारी युक्रेनची महिला स्नायपरने युद्धभूमीत दहशत पसरविली आहे. एकीकडे आकाशातून उडणाऱे कीव्हचे भूत आणि दुसरीकडे समोर कोणी दिसत नसताना रशियन सैनिकांचा वेध घेणारी स्नायपर टोळी, अशा दुहेरी संकटात रशियाचा आक्रमक फौजा अडकल्या आहेत.
धाकट्या भावाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युक्रेनच्या सैन्यात दाखल झालेल्या या चारकोल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या महिलेने रशियन सैन्याच्या मनात मोठी दहशत निर्माण केली आहे. एकेक पाऊल टाकताना रशियन सैन्याला तिच्यासारख्याच हजारो युक्रेनी स्नायपरची स्वप्ने पडू लागली आहेत. या महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
'चारकोल' या नावाने ओळखली जाणारी ही महिला स्नायपर आहे. युक्रेनच्या लष्कराने फेसबुकवर स्नायपरचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. याच तिचा अर्धा चेहरा झाकलेला फोटो दिसतो. या महिला स्नायपरची तुलना दुसऱ्या महायुद्धातील 'ग्रेट' शार्पशूटर 'लेडी डेथ'शी केली जात आहे.
रशियन आक्रमणावर तिने प्रतिक्रिया देताना म्हटले की, 'ही माणसं नाहीत. नाझीसुद्धा या बदमाशांइतके तुच्छ नव्हते. आम्हाला त्यांना बाहेर काढावे लागेल!'. जानेवारीपर्यंत ती युक्रेनच्या उत्तरेकडील रशिया समर्थित फुटीरतावाद्याविरोधात लढत होती. तिचे कंत्राट संपले होते. रशियाने हल्ला करताच ती पुन्हा युक्रेनच्या सेवेसाठी सैन्यात परतली.
कोण होती जगातील सर्वात खतरनाक स्नायपर... नाझी सैन्य जंग जंग पछाडत होते...दुसऱ्या महायुद्धात नाझी सैन्याचा कर्दनकाळ ठरलेल्या इतिहासातील सर्वात डेंजर महिला स्नायपर ल्युडमिलाशी तिची तुलना केली जाऊ लागली आहे. २५ वर्षांच्या या ल्यूडमिलाने तेव्हा ३०० हून अधिक नाझी सैनिकांचा जीव घेतला होता. तिला लेडी डेथ या नावाने ओळखले जायचे.