रियाध : आजपासून सौदी अरेबियातील महिला रस्त्यांवर वाहने चालवताना दिसणार आहेत. महिलांना वाहन चालविण्याचा अधिकार नसलेला जगातील एकमेव सौदी अरेबिया देश होता. मात्र, आता या देशात महिलांना वाहन चालविण्याचा परवानगी देण्यात आली आहे. त्यामळे या आखाती देशात जवळपास 1.51 कोटी महिला आता पहिल्यांदा रस्त्यांवर वाहने चालवताना दिसणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात सौदीचे किंग सलमान यांनी फर्मान काढून महिलांना वाहन चालविण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे हा निर्णय महिलांसाठी महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठरला होता. सौदीत महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेग-वेगळे कायदे आहेत. यामध्ये महिलांना वाहन चालवण्याची परवानगी दिली नव्हती. मात्र, किंग सलमान यांनी घेतल्याने निर्णयाचे जगभरातून स्वागत करण्यात आले होते. अमेरिकेनेही या निर्णयाचे स्वागत केले होते. सौदीतील महिलांना गाडी चालविण्यास परवानगी दिल्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हा निर्णय देशाला योग्य दिशेला घेऊन जाणारा आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या एका प्रवक्त्याने म्हटले होते.
गेल्या तीन वर्षांपूर्वी पहिल्यांदाच या देशातील महिलांना मदतानाचा हक्क देण्यात आला होता. या लढ्य़ात महिलांना वाहन चालविण्याची परवानगी मिळण्याची देखील मागणी करण्यात आली होती. तेव्हापासून या मागणीने जोर धरला होता. या मागणीसाठी अनेक महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली होती. अखेर गेल्यावर्षी या लढ्य़ाला यश आले आणि नवीन नियम काढून महिल्यांना आजपासून वाहने चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मौलवींचा होता विरोधमहिला हक्क कार्यकर्ते सौदीत 1990 पासूनच या अधिकाराची मागणी करत होते. न्यायपालिका आणि शिक्षणाच्या क्षेत्रात हस्तक्षेप करणा-या काही मूलतत्ववादी मौलवींचा याला विरोध होता. महिलांना वाहन चालविण्याचा अधिकार दिल्यास समाज भ्रष्ट होईल आणि पापाचा जन्म होईल असे मौलवींचे म्हणणे होते.