Work From Home Rules: कोरोना काळात (Coronavirus) कंपन्यांना कामाच्या नव्या पद्धतीबाबत समजले. घरून काम करण्याची पद्धत. अनेक कंपन्यांना वर्क फ्रॉम होम कल्चर (Work From Home) आत्मसात करावे लागले. लॉकडाऊनमुळे कर्मचारी घरून काम करू लागले. काही कंपन्यांनी कोरोनाची लाट ओसरली तरी तेच कल्चर पुढे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही कंपन्यांनी हायब्रिड कल्चर स्वीकारले आहे. यामध्ये काही दिवस कर्मचाऱ्यांनी ऑफिसमधून आणि काही दिवस घरून काम करता येते.
परंतू कर्मचाऱ्यांना याचा गोष्टींचा फायदा आणि तोटाही होऊ लागला. यामुळे पोर्तुगाल देशाने नवा नियम बनविला आहे. कामाच्या वेळेनंतरही जर बॉसने कर्मचाऱ्याल फोन किंवा मेसेजद्वारे कामाबद्दल विचारणा केली किंवा सूचना दिल्या तर पोर्तुगालसारख्या देशात ते बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. फ्रान्समध्ये 2017 मध्ये असाच नियम करण्यात आला होता ज्यामध्ये कामाच्या वेळेनंतर ई-मेलला उत्तर देणे आवश्यक नव्हते.
घरून काम करण्याबाबत सर्व नियम बनवले जात आहेत आणि दिवसेंदिवस बदलत आहेत. दरम्यान, पोर्तुगालमध्ये घरून काम करण्याबाबत एक विशेष नियम (Portugal Govt Work From Home Rules) करण्यात आला आहे, जो कर्मचाऱ्यांसाठी चांगला आहे. पोर्तुगालमध्ये घरून काम करण्याच्या नवीन नियमांची सध्या जगभरात चर्चा होत आहे.
पोर्तुगालच्या नवीन नियमांनुसार, कंपनी कोणत्याही कर्मचाऱ्याला त्याची शिफ्ट संपल्यानंतर कॉल करू शकत नाही. शिफ्ट झाल्यानंतरही कंपनीने एखाद्या कर्मचाऱ्याला बोलावले तर त्याला दंड होऊ शकतो. शिफ्ट झाल्यावर स्टाफला फोन करणार्या बॉस किंवा वरिष्ठालाही शिक्षा होऊ शकते. सरकारला असे आढळून आले की कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करताना सतत कामात व्यस्त ठेवतात, यामुळे ही नियमावली बनविण्याची आवश्यकता वाटली.
गरज का वाटलीकर्मचार्यांचा बॉस किंवा वरिष्ठ कर्मचाऱ्याला कधीही फोन करायचा. याचा कर्मचार्यांच्या वैयक्तिक जीवनावर वाईट परिणाम होत होता. घरी, कर्मचाऱ्याला ऑफिस कधी सुरू झालं आणि कधी संपलं हेही कळत नव्हतं आणि तो दिवसभर कामात व्यस्त राहत होता. शिफ्ट झाल्यानंतरही अशा कॉल्सचा कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे सरकारने म्हटले आहे. तथापि, कंपन्यांना कर्मचार्यांना अत्यंत गरज असल्यास फोन करण्याची परवानगी देण्यात आली आहे.