न्यूयॉर्क : भारतीय वंशाच्या दोन शिक्षणतज्ज्ञांनी गणित क्षेत्रातील प्रतिष्ठेचे जागतिक पुरस्कार पटकावले आहेत. यातील एकास गणिताचे नोबेल समजला जाणारा ‘फिल्डस् मेडल’ हा पुरस्कार मिळाला आहे.इंटरनॅशनल मॅथमॅटिकल युनियनतर्फे (आयएमयू) हे पुरस्कार देण्यात येतात. सेऊल येथे आयोजित आंतरराष्ट्रीय गणित परिषदेत मंजूल भार्गव यांनी फिल्डस् मेडल, तर सुभाष खोत यांनी रोल्फ नेवानलिन्ना पुरस्कार पटकावला. दर चार वर्षांनी देण्यात येणारा फिल्डस् मेडल पुरस्कार यावेळी चौघांना देण्यात आला आहे. भार्गव यांच्यासह इराणी वंशाच्या गणितज्ज्ञ, स्टॅनफोर्ड विद्यापीठातील प्रोफेसर मरयम मीरझकानी यांनाही फिल्डस् मेडल मिळाले असून हा पुरस्कार पटकावणाऱ्या त्या पहिल्या महिला गणितज्ज्ञ ठरल्या आहेत. संख्यांच्या भूमितीत महत्त्वपूर्ण नवीन पद्धत विकसित केल्याबद्दल भार्गव यांना फिल्डस् मेडल पुरस्कार देण्यात आला. (वृत्तसंस्था)
भारतीय वंशाच्या दोन गणिततज्ज्ञांना जागतिक पुरस्कार
By admin | Published: August 14, 2014 2:08 AM