वॉशिंग्टन : भारताने यशस्वीपणे राबविलेल्या ‘आधार’ उपक्रमाने जागतिक बँक प्रभावित झाली असून, या उपक्रमाच्या अनुभवाचा फायदा आफ्रिकी देशांसह अन्य देशात करून घेण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती भारताच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिली.‘भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणा’चे महासंचालक डॉ. अजय भूषण पांडे यांनी एका मुलाखतीत सांगितले की, येथे जागतिक बँकेतील अधिकारी ‘आधार’च्या उपक्रमाने फारच प्रभावित झाले आहेत. आता या उपक्रमाचा फायदा अन्य देशातही करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी पांडे येथे आले आहेत. या वेळी झालेल्या चर्चेच्या आधारे त्यांनी ही माहिती दिली. ‘आधार’सारखा उपक्रम आपल्या देशात राबवू इच्छिणाऱ्या देशांच्या अधिकाऱ्यांशीही पांडे यांनी चर्चा केली. भारतात आतापर्यंत एक अब्ज लोकांना ‘आधार’मुळे आॅनलाइन ओळख मिळाली आहे.
‘आधार’च्या यशाने जागतिक बँक प्रभावित
By admin | Published: May 02, 2016 12:20 AM