शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

रशिया पेटवणार तिसरे महायुद्ध?; युक्रेनच्या सीमेवर कुठल्याही क्षणी सैन्य सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 9:53 AM

गेल्या वर्षी नोव्हेंबरातच रशियाने युक्रेनच्या दिशेने वाटचाल सुरू केली. रशियाचा दोस्तराष्ट्र असलेल्या बेलारूसच्या साह्याने १ लाख १० हजार सैनिक युक्रेनच्या सीमेनजीक आले हाेते.

युक्रेनची चहूबाजूंनी कोंडी करणाऱ्या रशियाच्या फौजा आता कोणत्याही क्षणी या देशाचा घास घेण्यासाठी सज्ज आहेत. प्रचंड फौजफाटा रशियाने युक्रेनच्या आजूबाजूला आणून ठेवला आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धांचे सूप वाजले की, म्हणजे १६ फेब्रुवारीला, युक्रेनच्या सीमारेषेवर रणभेरी वाजवण्याचा रशियाचा इरादा आहे.

बेलारूसमध्ये शस्त्र साठा?

बेलारूसमध्ये रशियाचे ३० हजार सैनिक असून त्यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा केला असल्याचे नॉर्थ ॲटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन अर्थात ‘नाटो’चा दावा आहे. शस्त्रसाठ्यात सुखोई-३५ फायटर जेट्स, एस-४०० एअर डिफेन्स सिस्टीम आणि ५०० किमी अंतरापर्यंत मारा करू शकणारी अण्वस्त्रधारी इस्कंदर क्षेपणास्त्रे इत्यादींचा समावेश आहे, असे ‘नाटो’ म्हणते. क्रिमियामध्येही १० हजार रशियन सैनिक उतरले असावेत असा अमेरिकेला संशय आहे. युद्धसज्ज रशियाने ७ हजार टन इंधनसाठा तयार ठेवला आहे.

सैन्याची जमवाजमव किती?

गेल्या वर्षी नोव्हेंबरातच रशियाने युक्रेनच्या दिशेने वाटचाल सुरू केली. रशियाचा दोस्तराष्ट्र असलेल्या बेलारूसच्या साह्याने १ लाख १० हजार सैनिक युक्रेनच्या सीमेनजीक आले हाेते. आता ही संख्या दीड लाखांपर्यंत पोहोचली असल्याचा नार्वेजियन गुप्तचरांचा होरा आहे. त्याचबरोबर डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या बफर प्रदेशातही ३२ हजार सैनिक पेरण्यात आले आहेत.

नॉर्ड स्ट्रीम-२ चे महत्त्व

रशियातून थेट जर्मनीपर्यंत वाहिनीद्वारे नैसर्गिक वायूपुरवठा करण्याचा हा प्रकल्प आहे. बाल्टिक समुद्रातून ही प्रस्तावित वायुवाहिनी जाणार आहे. त्यामुळे युक्रेनचा तिळपापड झाला आहे. हा प्रकल्प होऊ नये यासाठी युक्रेनने जंगजंग पछाडले. रशियाकडून युरोपला जाणाऱ्या अनेक गॅसवाहिन्या युक्रेनमधून जातात. युद्ध झाल्यास युक्रेन या गॅसवाहिन्यांची कोंडी करेल, ही रशियाची भीती नॉर्ड स्ट्रीम-२ मुळे कमी झाली आहे. नॉर्ड स्ट्रीम-२ हा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्यामाध्यमातून त्यांना रशियाला गतवैभव प्राप्त करून द्यायचे आहे.

 

टॅग्स :russiaरशियाAmericaअमेरिका