शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

Bubble Hotel: सिंगापूरमध्ये जगातील पहिलं 'बबल बिझनेस हॉटेल'; नेमकं कसं आहे हे हॉटेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 5:06 PM

Singapore Bubble Hotel: सिंगापूरमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या (Covid-19) पार्श्वभूमीवर एक अनोखं हॉटेल तयार करण्यात आलं आहे.

सिंगापूरमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर एक अनोखं हॉटेल तयार करण्यात आलं आहे. 'बबल बिझनेस हॉटेल' असं या हॉटेलचं नाव आहे. ज्या लोकांना कामानिमित्त प्रत्यक्षरित्या भेटणं गरजेचं आहे अशा लोकांना या हॉटेलमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन भेट घेता येणार आहे. (worlds first Bubble Business Hotel in Singapore)

कोरोनाा धोका टाळणारं आणि सुरक्षितपणे बैठक घेता येईल अशी सुविधा देणारं हे जगातील पहिलं हॉटेल ठरलं आहे. पण या हॉटेलमध्ये ग्राहकांना काही कडक नियमांचंही पालन करावं लागणार आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला आखून देण्यात आलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं बंधनकारक आहे. मिटींग झाल्यानंतर किंवा काम आटोपल्यांतर तुम्हाला थेट विमानतळावरच परतावं लागतं. हॉटेल आणि विमानतळ व्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची ग्राहकांना परवानगी नाही. 

हॉटेल नेमकं कसं दिसतं?बबल हॉटेल अतिशय सुंदर पद्धतीनं डिझाइन करण्यात आलं आहे. प्रत्येक रुममध्ये एअरटाइट ग्लास तयार करण्यात आले आहेत. याशिवाय, कागदपत्रांसह सर्वच गोष्टी इथं काळजीपूर्वकपणे सॅनिटाइझ केल्या जातात. हे हॉटेल शहर आणि देशातील इतर हॉटेल्सपेक्षा वेगळं आहे. कोविड चाचणी केलेल्यांनाच या हॉटेलमध्ये प्रवेश आहे. 

हॉटेलचे पहिले पाहुणे कोण?बबल हॉटेलमध्ये पहिले पाहुणे हे फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया आणि संयुक्त अरब अमिरात येथून आले आहेत. त्यातील एका ग्राहकानं सिंगापूरमध्ये कंपनीच्या अतिशय महत्वाच्या बैठकीसाठी या हॉटेलमध्ये आल्याचं सांगितलं. हॉटेलच्या एका रुमचं एका रात्रीचं भाडं तब्बल २८४.७० यूएस डॉलर इतकं आहे. यात जेवणं, कोविड चाचणी आणि एअरपोर्टपर्यंतच्या प्रवासाचा खर्च देखील जोडण्यात आला आहे.  

टॅग्स :singaporeसिंगापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस