कोपनहेगन- ग्लोबल वॉर्मिंगमुळे ध्रुवावरील बर्फ वितळून समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे संपूर्ण जग चिंतेत असले तरी जहाज कंपन्यांना मात्र यातून एक वेगळाच फायदा होण्याची शक्यता आहे. आर्क्टिकवरील नॉर्दर्न सी रूट या कंपन्यांना आता अधिक काळ वापरता येण्याची शक्यता आहे.1 सप्टेंबर रोजी डेन्मार्कमधील मर्क्स कंपनीने कंटेनर भरलेले एक जहाज या मार्गावर पाठवून वाहतूक करता येईल का याची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. जर ही चाचणी यशस्वी झाली तर जहाजकंपन्यांना त्याचा फायदा होऊ शकेल.गेल्या दशकभरात पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे. यामुळे आर्क्टिकजवळील मार्ग दीर्घकाळ खुले राहिले तर वेळेमध्ये बचत होईल असे वाहतूक कंपन्यांना वाटते.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे जहाज कंपन्यांना फायदा, अधिक काळ होणार वाहतूक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 2:50 PM