इंग्लंड- जगातील सर्वात महाग सँडल्सची किंमत आहे १५.१ दशलक्ष डॉलर्स. सँडल्सची डिझाइन इंग्लडमधील डिझायनर डेब्बी विंगहॅम यांनी केली आहे. या सँडल्स वाढदिवसानिमित्त भेट देण्यासाठी बनवून घेण्यात आल्या आहेत. त्या कोणी तयार करून घेतल्या त्यांचे नाव जाहीर झालेले नाही.विंगहॅम यांनी यापूर्वी जगातील सर्वात महाग ड्रेस व ५० दशलक्ष डॉलर्सचा केक तयार केला होता. विंगहॅम या प्रसिद्ध व्यक्ती व राजघराण्यांतील व्यक्तींसाठी त्यांना हव्या तशा वस्तूंची निर्मिती करण्यासाठी ख्यातनाम आहेत. या सँडल्स अतिशय कष्टाने तयार करण्यात आल्या असून, त्यांची प्रत्येक गोष्ट अचूक व एकमेकांशी मिळतीजुळती आहे. अत्यंत दुर्मिळ असे मोठे गुलाबी आणि निळ्या हिºयांचा वापर त्यात करण्यात आला आहे. या हि-यांचीच किंमत ९,८०,००० पौंड आहे. त्यांच्यावर चार आणि तीन कॅरेटचे अत्यंत निर्दोष असे पांढरे हिरे लावण्यात आले आहेत. आणखी एक हजार पॉइंटर हिरे सजवटीसाठी वापरण्यात आले आहेत. हे लावण्यासाठी पारंपरिक केक बनवण्याचे कौशल्य वापरण्यात आले आहे. हे सगळे हिरे प्लॅटिनममध्ये बसवण्यात आले असून, सँडल्सच्या खाली उघडझाप करणाºया सरकत्या साखळ्या (झिप्स) व प्लेक हे ठाशीव सोन्याचे आहे. या सँडल्स निव्वळ हातांनी बनवण्यात आल्या असून, त्यासाठी कित्येक मनुष्यतास लागले आहेत. त्यांना शिवण्यासाठी १८ कॅरेट सोन्याच्या दोºयाचा उपयोग केला गेला आहे. एवढेच काय लेदर कोटिंग प्रक्रियादेखील २४ कॅरेट सोन्याच्या रंगाने केली गेली आहे. सँडल्स लेदरपासून बनवलेल्या अरेबियन जास्मीन फुलांनी सजवल्या असून, हिºयांनी मढवल्या आहेत.
जगातील सर्वात महाग सँडल्स १५.१ दशलक्ष डॉलर्सची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 5:26 AM