वॉशिंग्टन : मध्य पॅसिफिक महासागरात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे जगातील सर्वांत संरक्षित असे सागरी संग्रहालय उभारणार आहेत. यासाठी त्यांना अध्यक्षांचे अधिकार वापरावे लागले आहेत. सागरी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी ओबामा हे किती उत्सुक आहेत हे यावरून दिसते. या निर्णयासाठी ते काँग्रेसच्या मंजुरीचीही वाट बघणार नाहीत. सध्याचे पॅसिफिक रिमोट आयलँडस नॅशनल मरीन मॉन्युमेंट ८७ हजार चौरस मैल असून त्याचा ४ लाख ९० हजार मैल एवढा विस्तार केला जाणार आहे. गेल्या ५० वर्षांत अमेरिकेच्या कोणत्याच अध्यक्षांनी आपले कार्यकारी अधिकार वापरून एवढी जमीन व समुद्र यांचे संरक्षण केले नाही. हा भाग आता व्यापारी मासेमारीसाठी बंद असेल. ओबामा यांच्या या एकतर्फी निर्णयामुळे प्रशासनाला इतर प्राधान्याची कामे करणे जवळपास अशक्य झाले आहे. परदेशी राजकीय गुंतागुंती व देशात काँग्रेसच्या सभासदांमुळे कायद्याचे अडथळे यांना समोर ठेवून अध्यक्ष व त्यांच्या सल्लागारांनी पर्यावरण संरक्षणासाठीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी काळजीपूर्वक कार्यकारी अधिकार वापरले. (वृत्तसंस्था)
जगातील सर्वांत संरक्षित सागरी संग्रहालय अमेरिकेत
By admin | Published: September 26, 2014 5:11 AM