जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जॉन अल्फ्रेड टिनिसवुड यांचे सोमवारी वयाच्या 112 व्या वर्षी निधन झाले. त्याच्या कुटुंबीयांनीही याची पुष्टी केली आहे. जॉन आल्फ्रेड साउथपोर्ट केअर होममध्ये राहत होता. त्यांचे शेवटचे दिवस संगीत आणि प्रेमाने भरलेले होते, असे त्यांच्या कुटुंबीयांनी एका निवेदनात म्हटले आहे. टिनिसवुड यांचा जन्म 26 ऑगस्ट 1912 रोजी झाला (त्याच वर्षी टायटॅनिक बुडाले आहे). जॉन आल्फ्रेड 2020 मध्ये यूकेमधील सर्वात वृद्ध व्यक्ती बनले. एप्रिल 2024 मध्ये, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने त्यांना जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून मान्यता दिली. एप्रिल 2024 मध्ये, वयाच्या 111 व्या वर्षी, व्हेनेझुएलाचे 114 वर्षीय जुआन व्हिसेंट पेरेझ यांच्या निधनानंतर ते जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती बनले होते.
सैन्यातही होते... -टिनिसवुड यांनी एक सुंदर कुटुंब मागे सोडले. ते हुशार आणि अत्यंत धाडसी होते, असे त्याचे कुटुंबीय सांदतात. ते गणितातही हुशार होते. दुसऱ्या महायुद्धात रॉयल आर्मी पेस कॉर्प्समध्ये त्यांनी चांगली सेवा बजावली. ते तेथे अकाउंट्स आणि ऑडिटिंग शिवाय, अडकलेले सैनिक शोधून काढण्यासह खाण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचेही नियोजन करणे, आदी कामांचा समावेश होतो.
दीर्ग आयोष्यासंदर्भात काय म्हणाले होते अल्फ्रेड?निरोगी राहण्यासाठी टिनिसवुडचा मुख्य सल्ला, संयमाची प्रॅक्टीस करणे हा होता. जर आपण खूप अधिक पित असाल, खूप अधिक खात असाल अथवा खूप अधिक चालत असाल अथवा कुठलीही गोष्ट खूप अधिक करत असाल, तर शेवटी आपल्याला नुकसान भोगावे लागेल. मात्र, ऑगस्टमध्ये 112 वर्षांचे झाल्यानंतर, टिनिसवुड यांना त्याच्या दीर्घायुष्याचे रहस्य विचारले असता, 'केवळ नशीब' असे त्यांनी म्हटले होते.
ते म्हणाले होते, "मला विशेष रहस्य माहित नाही. मी लहान असताता प्रचंड सक्रिय होतो, खूप चालत होतो. मात्र, या गोष्टीचा काही संबंध आहे की नाही, हे मला माहीत नाही. मी कोणापेक्षा वेगळा नाही. अजिबात वेगळा नाही. मी हे अत्यंत सहजतेने घेतो, मी एवढा कसा जगलो, मला बिल्कुलच माहीत नाही."