लंडन : जेवताना हवे तेवढेच पानात वाढून घेणे, पानातील सर्व जिन्नस खाऊन संपविणे आणि भुकेपेक्षा दोन घास कमी खाणे या जगभरातील सर्वच संस्कृतींमध्ये एकेकाळी चांगल्या सवयी मानल्या जायच्या. पण बदललेल्या जीवनशैलीत जगभरातील लोकांना उपलब्ध असलेले सुमारे २० टक्के अन्न नको तेवढे खाण्याने किंवा पानात वाढून घेतलेले न खाता फेकून दिल्याने वाया जाते, असा निष्कर्ष एका अभ्यासातून काढण्यात आला आहे.ब्रिटनमधील एडिन्बर्ग विद्यापीठातील अभ्यासकांनी या अभ्यासावर आधारित शोधनिबंध ‘अॅग्रीकल्चरल सिस्टिम्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध केला आहे. प्रामुख्याने संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न अणि कृषी संघटनेने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीचे विश्लेषण करता या अभ्यासकांना असे आढळले की, उत्पादन, प्रक्रिया आणि सेवन या साखळीत प्रत्यक्षात पूर्वी मानले जात होते, त्याहून जास्त अन्नाची नासाडी होते. (वृत्तसंस्था)जगभरातील लोक गरजेपेक्षा १० टक्के जास्त अन्नाचे सेवन करतातजगभरात जेवढे अन्नधान्य पिकविले जाते त्याच्या निम्मे २.१ अब्ज टन अन्न वाया जाते. प्राणीज अन्नपदार्थांची उत्पादन प्र्रक्रिया सर्वाधिक अकार्यक्षम असल्याने अशा प्रकारे तयार होणारे सुमारे ७८ टक्के म्हणजे ८४० दशलक्ष टन अन्नाची नाशाडी होते.जगभरात २४० दशलक्ष टन प्राणीज खाद्यपदार्थांचे उत्पादन करण्यासाठी अन्नधान्याच्या पिकांपैकी सुमारे १.०८ अब्ज टन एवढा मोठा हिस्सा वापरला जातो.या एकाच टप्प्याला पिकविलेल्या ४० टक्के अन्नधान्य पिके कोणाच्याही पोषणासाठी वापर न होता वाया जातात.नको तेवढे खाण्याने एकूणच अन्न व्यवस्थेवर कसा व किती दुष्परिणाम होतो हे आजवर स्पष्ट नव्हते. पण आम्हाला असे आढळले की, नको तेवढे अन्न खाणे केवळ खाणाऱ्याच्या प्रकृतीलाच हानीकारक नाही तर त्याने पर्यावरणाचेही मोठे नुकसान होते व अन्न सुरक्षा कुंठित होते.- पीटर अॅलेक्झांडर, एडिनबर्ग स्कूल आॅफ जिओसायन्सेस
जगभरात २० टक्के अन्न वाया जाते!
By admin | Published: February 22, 2017 12:57 AM