चीनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चीनच्या लिओनिंग प्रांतमध्ये किड्यांचा पाऊस पडत असल्याचे समोर आले आहे. या कीटकांमुळे रस्त्यावरून चालणे कठीण झाल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांना इतर शहरांमध्ये आश्रय घेण्यास भाग पाडले जात असल्याचा दावा केला जात आहे. या संदर्भात फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही कीटक प्राण्यांसारखे आकाशातून पाऊस पडत असल्याचे दिसत आहे.
चीनच्या पंतप्रधानपदी ली कियांग यांची निवड
लिओनिंग प्रांतातील रस्ते कीटकांनी भरलेले आहेत. कार आणि रस्त्यावर किड्यांचे ढीग पसरलेले आहेत. रस्त्यावरून चालणारे लोक किड्यांना टाळण्यासाठी छत्री घेऊन येत आहेत. चीनमधील माध्यमांनी या संदर्भात बातमी दिली आहे. वाऱ्यांमुळे हे कीटक या प्रांतात आले आहेत. वादळाच्या वेळी भोवऱ्यात पकडलेले कीटक लिओनिंग प्रांतात घिरट्या घालत आहेत.
हे किडे नसून चिनाराची फुले असल्याचे लोक सोशल मीडियावर सांगत आहेत. त्याची फुले ट्यूलिप्ससारखी असतात. काही लोक म्हणत आहेत की हे किडे आहेत. हे कीटक किंवा प्राणी नाहीत, तर झाडांवरून पडलेल्या फुलांचे देठ आहेत, असंही नेटकरी सांगत आहेत.
"वसंत ऋतूमध्ये चिनाराच्या झाडांवरून पडणाऱ्या वस्तू सुरवंट नसून चिनाराच्या झाडांची फुले आहेत. चिनारची फुले गळायला लागली म्हणजे ती फुलणार आहेत" असंही एका नेटकऱ्याने म्हटले आहे.
हा किड्यांचा पाऊस नसून ही फुल असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. या दिवसात या फुलांचा मोठा बहर असतो. ही फुल किड्यांसारखी दिसतात. कधी कधी जोरदार वाऱ्यामुळे कीटक घिरट्या घालू लागतात.