ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30- सर्जिकल स्ट्राइकद्वारे पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय लष्कराने 35 ते 40 दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि भारतीय सैन्यासोबत पंतप्रधान नरेंद मोदींवर सर्वच स्थरातून कौतुकाचा वर्षावही सुरू झाला.
मूळचा पाकिस्तानी असलेला मात्र, नुकतंच भारतीय नागरिकत्व मिळालेला गायक अदनान सामीही यामध्ये मागे नाही. 'दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईबद्दल आपल्या धाडसी जवानांचं आणि पंतप्रधान मोदींचं मनापासून अभिनंदन' असं ट्वीट सामीने केलं आहे. सामीच्या या ट्वीटने पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळायचंच काम केलं आहे. पाकिस्तानातून मात्र, सामीच्या या ट्विटवर तिखट प्रतिक्रिया उमटत असून सामीवर चांगलंच तोंडसूख घेण्यात येत आहे.
Big Congratulations to @PMOIndia & our brave Armed forces for a brilliant, successful & mature strategic strike against #terrorism ! #Salute— Adnan Sami (@AdnanSamiLive) September 29, 2016
@AdnanSamiLive@bk253@PMOIndia its not u but Fear inside you is speaking this nonsense k you might loose indian nationality, if didn't bark— ☆♥پرانا پاکستانی♡ (@I_H_Shahid) September 30, 2016
@AdnanSamiLive@PMOIndia you Bloody traitor, tum apni Maa (Pak) kay nahi ho saky or kis k hogy,
— Ali Shaaf (@AliRazaShaaf) September 30, 2016
1 जानेवारी 2016 रोजी अदनानला केंद्र सरकारने भारतीय नागरिकत्व दिलं होतं. मानवतेच्या दृष्टिकोनातून आपल्याला भारतीय नागरिकत्व देण्यात यावे असा अर्ज सामीने केला होता.