मुंबई - चीन देशातील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री फॅन बिंगबिंगला कर बुडविल्याप्रकरणीचीन सरकारने तब्बल ९५१ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. फॅन बिंगबिंग ही गेल्या जुलैपासून बेपत्ता आहे. फॅन केवळ चीनमध्ये नव्हे, तर हॉलीवूडमध्येही खूप लोकप्रिय आहे. तिच्यावर आणि तिच्या कंपनीवर कर बुडवल्याचा ठपका ठेवत चीन सरकारने नोटीस बजावली आहे. फॅनने आपले खरे उत्पन्न दडविले असून कर चुकविण्यासाठी कमी उत्पन्न दाखविल्याचा तिच्यावर आरोप आहे.
पोलिसांनी फॅन हिच्या एजंटला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कर चोरीसाठी तिला सर्वाधिक ९५१ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड दिलेल्या कालावधीत न भरल्यास तिला तुरुंगवास भोगावा लागणार आहे. यानंतर जुलैपासून बेपत्ता असलेल्या फॅन बिंगबिंगने सरकारकडे याबाबत माफी मागत लवकरात लवकर दंड भरणार असल्याचे सांगितले. तसेच फॅनने अशा प्रकारे पहिल्यांदाच कर चुकवेगिरी केल्यामुळे तिने जर हा दंड भरला तर तिच्याविरोधातील गुन्हा रद्दबातल होऊ शकतो.