दक्षिण आफ्रिकेमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या बॉडीगार्डला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले आहे. जिनपिंग जात असताना हा बॉडीगार्ड त्यांच्या मागून पळत घुसण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा तेथील सुरक्षा रक्षकांनी त्याला अडविले आणि पकडून ठेवत दरवाजा लावून घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
बुधवारी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग ब्रिक्सच्या रेड कार्पेटवर पोहोचले तेव्हा त्यांच्या एका सहाय्यकाला तिथे तैनात असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी रोखले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यादरम्यान शी जिनपिंग अनेक वेळा मागे वळून पाहत होते.
जिनपिंग जात असताना ते अनेकदा मागे वळून, नजर वळवून पाहताना दिसत आहेत. परंतू, तिथे बॉडीगार्डला रोखण्यासाठी सुरक्षा रक्षकांची धक्काबुक्की सुरु असल्याचे दिसत आहे.
शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी आपण राजकीय आणि सुरक्षा सहकार्य वाढवले पाहिजे. शीतयुद्धाची मानसिकता अजूनही आपल्या जगाला सतावत आहे. भौगोलिक राजकीय परिस्थिती गंभीर होत चालली आहे. ब्रिक्स देशांना शांततापूर्ण विकासासाठी काम करत राहावे लागेल, असे जिनपिंग यांनी परिषदेत म्हटले.