रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर सुरू झालेल्या युद्धाला २४ फेब्रुवारीला वर्ष पूर्ण झाले. यात वर्षभरात २७ हजार जण मारले गेले तर १.८६ कोटीहून अधिक लोक बेघर झाले. आढावा घेऊया या वर्षभरात कुणी नेमके काय कमावले आणि काय गमावले?
जागतिक युद्ध होणार? सध्या रशियाच्या मदतीला चीन जाण्याच्या बातम्या समोर येत असल्याने चिंता वाढली आहे. युक्रेन अध्यक्षांनी म्हटले की, जर चीनने रशियाला मदत केली तर जागतिक युद्धाला सुरुवात होऊ शकते. मात्र, चीन रशियाच्या मदतीला जाण्याची भीती वाढली आहे.
जागांवरही परिणाम : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलेल्या माहितीनुसार, युद्धामुळे १ लाख कोटी डॉलरच्या उत्पादनासमान नुकसान झाले आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमतींत श्रीमंत देशांमध्ये ७.३ टक्के वाढ झाली आहे. जानेवारी २०२२ मध्ये या किमती ३.९ टक्क्यांपेक्षा कमी होत्या. गरीब देशांमध्ये ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमतीत ९.९ टक्के इतकी वाढ झाली आहे.
युक्रेनचे नागरिक कुठे-कुठे पळाले? पोलंड - ९६,०४,२३२बेलारूस - १६,७०५हंगेरी - २२,१५,९४३ रशिया - २८,५२,३९५ स्लोवाकिया - ११,६२,८६२रोमानिया - १९,६७,२११मोल्दोवा - ७,७०,३५४एकूण - १८,५८९,७०९
भारताचा मिलन पुस्तकाने जोडतोय मनेविस्थापित झालेल्या युक्रेनियन मुलांसाठी १० वर्षांचा भारतीय वंशाच्या मिलन पॉल कुमार धावून आला आहे. त्याने ब्रिटनमध्ये युक्रेनच्या मुलांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर जमा झालेल्या निधीतून त्याने पोलंड येथे क्राको शहरात जाऊन वह्या, पुस्तके तसेच स्टेशनरी मुलांना दिली.
युक्रेनचे किती नुकसान झाले?एअरपोर्ट - १२ गाड्या, वाहने - १,०५,२०० शेती उपकरणे - ४३,७०० शाळा - २,५०० मॉल, दुकाने - २,०००घरे - १,४०,०००मोठी बंदरे - ३ (ओडेसा, खेरसॉन, मारियोपोल) पायाभूत - नऊ लाख कोटी सुविधांचे नुकसानएकूण नुकसान - ५० लाख कोटी
युक्रेनचा किती भूभाग परत? पहिला टप्पा - २४ फ्रेबुवारी २०२२ ४४ हजार चौरस किलोमीटर इतक्या युक्रेनच्या भूभागावर रशियाचा कब्जा दुसरा टप्पा - २४ मार्च २०२२ १.३३ लाख चौरस किलोमीटर इतक्या युक्रेनच्या भूभागावर रशियाचा कब्जा तिसरा टप्पा - १७ नोव्हेंबर २०२२ २८ हजार चौरस किलोमीटर इतका भूभाग युक्रेनने रशियाकडून पुन्हा परत मिळवला
युक्रेनला जगभरातून किती मदत? (कोटी डॉलर्स)अमेरिका - ४,७८२इंग्लंड - ७०८जर्मनी - ५४५कॅनडा - ३७८पोलंड - ३००एकूण मदत - ११,५००मदत करणारे एकूण देश - ४०