शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

आधीच युद्ध, त्यात कोरोना; येमेन संकटाच्या खाईत!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 5:05 AM

येमेनसमोर दुहेरी संकट; नागरिकांची अवस्था अतिशय वाईट

येमेनशुक्रवारचीच गोष्ट, येमेनमध्ये पहिलावहिला कोरोनाबाधित सापडला. त्याची तब्येत हळूहळू सुधारते आहे. ते प्रमाण वाढणार नाही, आम्ही कडेकोट बंदोबस्त केला आहे असं येमेनमधून अधिकृतरीत्या सांगण्यात येत आहे. पण सांगणारे आहेत, ते अधिकृत का? नेमके अधिकृत सरकार कुणाचे असा प्रश्नही तिथं आहे.त्या प्रश्नाच्या खोलात जाण्यापूर्वी हा एक येमेनी शेफ व अरेबिक अनुवादक आहे. गेले अनेक दिवस तो आठवड्यातून दोनदा आपल्या युट्यूब चॅनलद्वारे ‘आयसोलेशनमधले दिवस’ अशी कहाणी सांगतोय. तिथं जगायचं कसं? आनंदानं कसं जगायचं हे सांगतोय इटालियन माणसांना. तो राहतो इटलीत. मिलानमध्ये. एका इटालियन मुलीशी त्यानं चार वर्षांपूर्वी लग्न केलं आणि येमेन सोडलं. सध्या संपूर्ण इटलीत लॉकडाऊन असल्यानं तो इटलीवासीयांना सांगतोय की, ‘आम्ही येमेनमध्ये तर कायमचे आयसोलेट आहोत, जन्मालाच आमच्या लॉकडाऊन पुजलंय. आम्ही कसे जगतो, हे पहा. हेही दिवस जातील, आनंदाने जगा!’सध्या त्याचं हे चॅनल लोकप्रिय होतं आहे. त्याचं कारण येमेनींच्या जगण्याची कहाणी. येमेनमध्ये युद्ध पेटलं, नंतर अनेक येमेनी युरोपात स्थलांतरित झाले. लॉकडाऊनच्या काळात हा येमेनी शेफ , त्याचं नाव ताहा अल जलाल, युद्धग्रस्त काळातही उमेद पोटाशी धरून येमेनी माणसं कशी जगत आहेत व त्यातून काही उमेद वाटता येतेय का, हे पाहत अनुभव सांगतो आहे.२०१५ पासून ताहा मिलानमध्ये राहतो. तेथे येऊन त्याने इटालियन मुलीशी त्यानं लग्न केलं. २०१६ ला ते येमेनला त्याच्या कुटुंबाला भेटायला गेले. बेचिराख झालेला देश. माणसं घरात कोंडलेली. परत येताना म्हणजे २०१६ मध्ये त्यांना येमेन व ओमानच्या बॉर्डरवर डिटेन केलं. सगळी कागदपत्रं होती तरी चौकशीसाठी थांबविलं. ते ताहा सांगतो, अशा चौकशीचा अनुभव मला नवा नव्हता, पण माझ्या बायकोला हे नवीन होतं. आम्हाला तीन दिवस लहानशा हॉलमध्ये ठेवलं. तिथं प्रचंड गर्दी. सगळेच देश सोडून निघालेले. तसे सधन, पण देश सोडण्यावाचून पर्याय नसलेले. तीन दिवस पोटापुरतं खायला व पाणी देत. तिथं वायफाय नव्हतं, बाहेरचं जग दिसायचं नाही. तिथून बाहेर पडण्यासाठी कासावीस झालेले लोक. त्यातही आम्ही जगलो. एकमेकांशी दोस्ती झाली. सुख-दु:ख वाटली. मी हेच सांगतोय, माझ्या चॅनलद्वारे की, ‘माणसं प्रेमळ असतात. त्यांच्यावर भरवसा ठेवा. आपली जीवनेच्छा अशी दांडगी असते की, माणूस म्हणून कोणत्याही परिस्थितीत जगू शकतो. हार मानत नाही. तेच आता लॉकडाऊनमध्ये करायची गरज आहे.’तो म्हणतो, ‘मी परक्या देशात अडकलो आहे. माझं कुटुंब युद्धग्रस्त देशात. त्यांच्या जीविताची खातरी नाही. काय होईल माहिती नाही. तरी आम्ही जगतोच आहोत ना. मग बाकी जग घरात सुरक्षित का नाही जगू शकत?’ ताहा म्हणतोय ते खरं आहे. गेलं दशकभर येमेन धुमसतं आहे. २०११-१२ मध्ये अरब स्प्रिंगनंतर येमेनचे सत्ताधीश अली अब्दुल्ला सलेह यांची सत्ता गेली. त्यांच्या पश्चात गृहयुद्ध भडकलं. २०१४ पासून ते जास्तच गंभीर झालं. युद्धच सरू झालं. बंडखोर ‘हाऊथी’ म्हणवणाऱ्या गटाने एकेक करत येमेनचा भाग ताब्यात घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी लढाई सुरूझाली. एकीकडे युद्ध आणि दुसरीकडे कोरोना अशी स्थिती आहे. माणसं जीव मुठीत धरून जगत आहेत. आता येमेनच्या सीमा बंद केल्या असून जगापासून संपर्क पूर्ण तोडण्यात आला आहे.संयुक्त राष्टÑसंघानंही सांगितलं की, युद्ध आणि कोरोना त्यापायी जाणारे जीव हे दोन्ही एकदम येमेनला झेपणारं नाही, जरा सबुरीनं घ्या, तुमची आरोग्य यंत्रणा मुळात खिळखिळी आहे, त्यात भर नको.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या