शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

आधीच युद्ध, त्यात कोरोना, येमेन संकटाच्या खाईत!

By meghana.dhoke | Published: April 20, 2020 2:41 PM

येमेनी माणसाला लॉकडाउन आणि आयसोलेशन नवं नाही, त्यात पहिला कोरोना बाधित सापडला.

ठळक मुद्देसंयुक्त राष्ट्रसंघानंही सांगितलं की, युद्ध आणि कोरोना त्यापायी जाणारे जीव हे दोन्ही एकदम येमेनला झेपणारे  नाही, जरा सबुरीनं घ्या.

शुक्रवारचीच गोष्ट, येमेनमध्ये पहिलावहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडला. त्याची तब्येत आता हळूहळू सुधारते आहे. ते प्रमाण वाढणार नाही, आम्ही सगळा कडेकोट बंदोबस्त केला आहे असं येमेनमधून अधिकृतरित्या सांगण्यात येत आहे.पण सांगणारे आहेत, ते आधिकृत का? नेमके अधिकृत सरकार कुणाचे असा प्रश्नही तिथं आहे.त्या प्रश्नाच्या खोलात जाण्यापूर्वी ही एका येमेनी शेफ आणि अरेबिक अनुवादक आहे.गेले अनेक दिवस तो आठडडय़ातून दोनदा आपल्या युटय़ूब चॅनलदद्वारे ‘ आयसोलेशनमधले दिवस’ अशी कहाणी सांगतोय. तिथं जगायचं कसं? आनंदानं कसं जगायचं हे सांगतोय. इटालियन माणसांना.तो सध्या राहतो इटालीत. मिलानमध्ये. एका इटालीयन मुलीशी त्यानं दोन वर्षापूर्वी लग्न  केलं आणि येमेन सोडलं.सध्या संपूर्ण इटलीतच लॉकडाउन असल्यानं तो इटलीवासियांना सांगतोय की, आम्ही येमेनमध्ये तर कायमचेच आयसोलेट आहोत, जन्मालाच आमच्या लॉकडाउन पुजलंय. आम्ही कसे जगतो, हे पहा. हे ही दिवस जातील, आनंदाने जगा!’

सध्या त्याचं हे चॅनल लोकप्रिय होतं आहे. त्याचं कारण त्याच्या आणि पर्यायानं येमेनी माणसांच्या जगण्याची कहाणी. येमेनमध्ये युद्ध पेटलं, त्यानंतर अनेक येमेनी युरोपियन देशात स्थलांतरीत झाले. स्थलांतरीतांचे लोंढे म्हणून स्थानिकांनी नाकं मुरडली.आता लॉकडाउनच्या काळात हा येमेनी शेफ , त्याचं नाव ताहा अल जलाल युद्धग्रस्त काळातही उमेद पोटाशी धरुन येमेनी माणसं कशी जगत आहेत, आणि त्यातून काही उमेद वाटता येतेय का हे पाहत आपले अनुभव सांगतो आहे.2015 पासून ताहा मिलानमध्ये राहतो. तो एका इटालियन मुलीच्या प्रेमात पडला, तिच्याशी लग्न  करायचं म्हणून मिलानला आला. 2015 मध्येच त्यांनी लगA केलं. 2015 ला ते येमेनला त्याच्य कुटुंबाला भेटायला म्हणून गेले. बेचिराख झालेला देश. माणसं घरात कोंडलेली.बंकर करुन राहावं तसं राहणारी. त्यावेळी परत येताना म्हणजे 2क्16 साली त्यांना येमेन आणि ओमानच्या बॉर्डरवर डिटेन करण्यात आलं. सगळी कागदपत्रं होती तरी चौकशीसाठी थांबवण्यात आलं. ती गोष्ट ताहा सांगतो.तो म्हणतो, अशा चौकशीचा अनुभव मला नवा नव्हता, पण माङया इटलीयन बायकोला हे नवीन होतं. आम्हाला तीन दिवस एका लहानशा हॉलमध्ये ठेवण्यात आलं. तिथं माणसांची प्रचंड गर्दी. सगळेच देश सोडून जीव मुठीत घेऊन निघालेले, तसे सधन. पण आता देश सोडण्यावाचून पर्याय नसलेले. तीन दिवस आम्ही तिथं होतं, फक्त बसून. पोटापुरतं खायला आणि पाणी देत. तिथं वायफाय नव्हतं, बाहेरचं जग दिसायचं नाही. लोक सगळेच अस्वस्थ, तिथून बाहेर पडण्यासाठी कासाविस झालेले. त्या अवस्थेतही आम्ही जगलो. हळूहळू एकमेकांशी दोस्ती झाली. सुखदु:ख वाटली. मी हेच सांगतोय, माङया चॅनलद्वारे की, माणसं प्रेमळ असतात. त्यांच्यावर भरवसा ठेवा. आणि स्वत:वरही. आपली जीवनेच्छा अशी दांडगी असते की माणूस म्हणून  आपण कोणत्याही परिस्थितीत जगू शकतो, जगायचा प्रयत्न करतो. हार मानत नाही.तेच आता लॉकडाउनमध्ये करायची गरज आहे.’तो म्हणतो, ‘ मी स्वत: एका परक्या देशात अडकलो आहे. माझं कुटुंब युद्धग्रस्त देशात त्यांच्या जीवीताची खातरी नाही. पुढे काय होईल माहिती नाही. तरी आम्ही जगतोच आहोत ना, येमेनी माणूस जर भयंकर युद्धात जपू शकतो तर मग बाकी जग घरात सुरक्षित का नाही जगू शकत?’ताहा म्हणतोय ते खरं आहे,  गेलं दशकभर येमेन धुमसतं आहे. 2010/11 मध्ये अरब स्प्रिंग नंतर येमेनचे सत्ताधिश अली अब्दुल्ला सलेह यांची सत्ता गेली. ते तीन दशकं येमेनचे सत्ताधिश होते. त्यांच्या पश्चात मात्र गृहयुद्ध भडकलं. 2014 पासून तर ते जास्तच गंभीर झालं. युद्धच सुरु झालं. बंडखोर ‘हाऊथी’ म्हणवणा:या गटाने एकेक करत येमेनचा भाग ताब्यात घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी लढाई सुरु झाली. आजही येमेनचा बहुतांश भाग त्यांच्या अखत्यारित आहे.सरकार तर पदच्यूतच आहे. कोरोनामुळे सारं जग संकटात असतानाही त्यांनी युद्धबंदी जाहीर केलेली नाही.एकीकडे युद्ध आणि दुसरीकडे कोरोना अशी स्थिती आहे. माणसं जीव मुठीत धरुन जगत आहेत. आता येमेनच्या सीमा बंद करण्यात आल्या असून जगापासून संपर्क पूर्ण तोडण्यात आला आहे.संयुक्त राष्ट्रसंघानंही सांगितलं की, युद्ध आणि कोरोना त्यापायी जाणारे जीव हे दोन्ही एकदम येमेनला झेपणारे  नाही, जरा सबुरीनं घ्या, तुमची आरोग्य यंत्रणा मुळात खिळखिळी आहे, त्यात भर नको.शुक्रवारी पहिला बाधित कोरोनात सापडला, आता पुढं त्याचा संसर्ग होणार नाही या प्रार्थनेपलिकडे स्थानिक लोक तिथं आता काहीही करू शकत नाहीत.