इस्लामाबाद : आपल्या कथित लैंगिक संभाषण माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी सार्वजनिक केल्याचा आरोप पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे.
‘एकदा बाजवा यांनी मला प्लेबॉय म्हटले होते. यावर मी आधी प्लेबॉय होतो. मी कधीच देवदूत असल्याचा दावा केला नाही, असे त्यांना म्हटले होते,’ असा खुलासाही खान यांनी केला आहे.
खान यांच्या तीन कथित लैंगिक संभाषणाच्या ध्वनिफिती व्हायरल झाल्या होत्या. त्यात ते दोन भिन्न स्त्रियांशी संभाषण करताना ऐकू येतात. या ध्वनिफिती बाजवा यांनी लीक केल्याचा आरोप खान यांनी केला.