माले: आज जगभरात 8वा आंतरराष्ट्रीय 'योग दिवस' साजरा केला जात आहे. यानिमित्ताने मालदीवची राजधानी माले येथील गलोल्हू नॅशनल फुटबॉल स्टेडियममध्ये योगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी इस्लामिक कट्टरवाद्यांच्या एका गटाने स्टेडियमवर हल्ला केला. राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
साहित्याची तोडफोडकार्यक्रमादरम्यान अचानक 100 हून अधिक लोक ध्वज घेऊन स्टेडियममध्ये धावत आले आणि त्यांनी लोकांना हुसकावून लावले. यावेळी कट्टरपंथीयांनी स्टेडियममध्ये लावण्यात आलेले योगाशी संबंधित पोस्टर-बॅनर्स आणि फलकांची मोडतोड केली. एवढेच नाही तर कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग करणाऱ्या लोकांवरही या लोकांनी हल्ला केला. कट्टरवाद्यांनी हातात काही फलक आणि पोस्टर्स घेतल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यावर योगाच्या विरोधात घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. त्यावर इंग्रजीत लिहिले होते- 'योग म्हणजे शिर्क' म्हणजेच 'इस्लाममध्ये योग करणे पाप आहे'.
आतापर्यंत 6 जणांना अटक याप्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे. मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले- मालदीव पोलिसांनी सकाळी गलोल्हू स्टेडियमवर घडलेल्या घटनेचा तपास सुरू केला आहे. ही गंभीर बाब असून, याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. इंडियन कल्चर सेंटरने हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला उच्चस्तरीय अधिकारी आणि अनेक सरकारी अधिकारीही उपस्थित होते. मंगळवारी सकाळी कार्यक्रम सुरू होताच कट्टरवाद्यांनी हल्ला केला. यापूर्वीही कार्यक्रम बंद करण्याच्या धमक्या आल्या होत्या.