शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘तुम्ही लादेनचे मित्र आहात’ शरीफना श्रोत्यानेच ऐकविले

By admin | Published: October 24, 2015 2:59 AM

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना शुक्रवारी भाषणात निषेधकर्त्या श्रोत्याकडून ‘तुम्ही ओसामा बिन

वॉशिंग्टन : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना शुक्रवारी भाषणात निषेधकर्त्या श्रोत्याकडून ‘तुम्ही ओसामा बिन लादेनचे मित्र असल्याचे’ ऐकावे लागले. शिवाय या श्रोत्याने अस्वस्थ बलुचिस्तान प्रांत स्वतंत्र करा अशी मागणीही केली.येथील युएस इन्स्टिट्यूट आॅफ पीस या स्वतंत्र वैचारिक संस्थेत शरीफ भाषण करीत असताना हा निदर्शक मध्येच उभा राहून त्याने बलुचिस्तान प्रांतात लष्कराकडून कार्यकर्त्यांचे अपहरण होऊन त्यांचा छळ करून नंतर मारून टाकले जात असल्याचा गंभीर आरोप केला. त्याच्या हातात ‘बलुचिस्तान मुक्त करा’ (फ्री बलुचिस्तान) असे लिहिलेला फलकही होता. या नंतर लगेचच सुरक्षा सैनिकांनी त्याला सभागृहाबाहेर हलविले. या गडबडीत शरीफ यांना किंचित काही वेळ भाषण थांबवून नंतर ते सुरू करावे लागले.स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी फुटीरवाद्यांशी पाकिस्तानी लष्कराला अनेक वेळा लढावे लागले आहे. २००६ मध्ये तत्कालीन अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी बलूच आदिवासी नेते नबाव अकबर बुगती यांच्यावर बाँब टाकण्याचे आदेश दिले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला व तेव्हापासून नव्याने तेथे फुटीरवादी चळवळ सुरू झाली. बलुचिस्तानातील फुटीरवादी चळवळ आम्ही जिंकल्याचा दावा पाकिस्तानचे लष्कर करीत असून बलुची कार्यकर्ते मात्र लष्कर कार्यकर्त्यांचे अपहरण करून त्यांचा छळ करते व नंतर त्यांची हत्या करते असा आरोप करीत आहेत. यामुळे तेथील संघर्ष अधिक चिघळत चालला आहे.