टेक्सास : सध्या न्यू इयरची धूम सुरू असल्याने अनेक ठिकाणी विविध पार्टीचं आयोजन करण्यात येतंय. या पार्टीला आणखी रंगतदार बनवण्यासाठी शँपेन तर पाहिजेच. त्यामुळे अशा पार्टीमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे पेयांचे सेवन करण्याची संधी मिळते. पण अशा मादक पेयांचे सेवन करताना थोडीशी सावधानगी बाळगायला हवी असं संशोधकांनी सांगितलं आहे. तुम्ही कोणत्या कपमधून शँपेन किंवा फेस येणारी पेय पिता यावरून त्या पेयांची चव ठरत असते. जर तुम्ही प्लास्टिकच्या कपमधून पेय पित असाल तर तुम्ही पेयाची मुळची चव चाखत नाही, असं संशोधकांनी म्हलं आहे.
डेलिमेलने दिलेल्या वृत्तानुसार, एक असा अभ्यास समोर आला आहे की, जर तुम्ही शँपेन पेय प्लास्टिकच्या कपमधून घेत असाल तर शँपेनची चव थोडीफार बदललेली असते. याबाबतीत, टेक्सास युनिर्व्हिसिटीतील लॅबोरटीमध्ये संशोधन करण्यात आलंय. जर तुम्ही फेस येणारी दारू कपमध्ये ओतली तर कपच्या आवरणाला हे फेस चिकटतात, परिणामी हे फेस आणखी फसफसतात त्यामुळे शँपेनची चव बिघडते. केवळ शँपेनच नव्हे तर इतर फेस येणारी पेय जर तुम्ही प्लास्टिकच्या कपमधून घेत असाल तर त्याची मुळ चव बिघडते.
आणखी वाचा - जादुई रात्रींची दुबई एकदा अनुभवायलाच हवी!
जर वाईन किंवा शँपेन जास्त फसफसली की त्याची टेस्ट खराब होते, असं युनिर्व्हिसीटीतील अभ्यासकांनी म्हटलं आहे. तसंच, स्टेरोफोमचे कपही पार्टीमध्ये टाळले पाहिजे. युनिर्व्हिसिटीच्या वरिष्ठ अभ्यासकांनी असं सांगितलं की, स्टेरोफोमच्या कपमधूनही अधिक फेस निर्माण होतो. त्यामुळे पार्टीच्या दरम्यान प्लास्टिक आणि स्टेरोफोम टाळलं पाहिजे. न्यू इयरच्या पार्श्वभूमीवर हे संशोधन बाहेर आल्याने तुम्हीही जर पार्टीचं आयोजन करत असाल तर प्लास्टिक किंवा स्टेरोफोमचे कप टाळा. जेणेकरून या फसफसणाऱ्या पेयांची चव तुम्ही चाखू शकणार नाही.