वॉशिंग्टन - कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून लॉकडाऊननंतर पुन्हा नोकऱ्या मिळविण्यासाठी तरुणांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उद्योगधंदे सुरू झाल्याने नोकऱ्याही उपलब्ध होताना दिसत आहेत. नोकरीसाठी अनेकजण वणवण करतानाही पाहायला मिळतात. मात्र, एका पठ्ठ्याने काम आवडत नसल्याने आपल्या नोकरीचाराजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, कामाच्या ठिकाणी पोस्टर चिकटवून त्याने आपण नोकरी सोडत असल्याचे सांगतिले.
सोशल मीडियावर नोकरी सोडल्याचे पोस्टर सध्या व्हायरल होत आहे. अतिशय रुबाबात या पठ्ठ्याने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना लिहिलेल्या दोन ओळींमुळे हा मुलगा चर्चेचा विषय बनला आहे. मॅकडॉनॉल्डमध्ये हा तरुण काम करत होता. मात्र, त्याला हे काम आवडत नव्हते. त्यामुळे, त्याने नोकरी सोडली आहे. नोकरी सोडताना साधारणपणे ईमेल किंवा पत्र लिहून राजीनामा दिला जातो. पण, अमेरिकेतील लुईसविले येथील पठ्ठ्याने मॅकडॉनॉल्ड आऊटलेटच्या बाहेरच पोस्टर चिकटवून नोकरी सोडत असल्याचे म्हटले आहे.
आम्ही यासाठी बंद आहोत, कारण मी नोकरी सोडत आहेत. मला या कामाचा मोठा तिटकारा आहे, असे पोस्टर या युवकाने आऊटलेटच्याबाहेर चिकटवले आहे. सध्या सोशल मीडियावर हा राजीनामा चांगलाच व्हायरल होत आहे. फोटोमध्ये मॅकडॉनॉल्डचं आऊटलेटही दिसत आहे. ग्रेट अॅप डॅड या ट्विटर हँडलवरुनही हा फोटो शेअर करण्यात आला आहे.