एक लग्नाळू तरुणी पहिल्यांदाच एका अनोळखी तरुणाच्या घरी जेवायला जाते, तेवढ्यात तिथे कठोर लॉकडाऊन लागतो, आणि ती तिथेच अडकते. त्या तरुणीला त्या तरुणासोबत एकाच घरात रहावे लागते. ही घटना आहे चीनच्या झेंगझौ शहरातील. वांग नावाच्या महिलेला गेल्या आठवड्यात या प्रसंगातून जावे लागले.
वांगचे कुटुंबीय तिच्यासाठी सुयोग्य नवरा पाहत आहेत. यासाठी त्यांनी १० स्थळे शोधून ठेवली होती. हा तरुण त्यांच्यापैकीच एक होता. त्याने वांगला तो किती छान छान जेवण बनवितो, हे दाखविण्यासाठी त्याच्या घरी निमंत्रित केले होते. ती त्याच्या घरी पोहोचताच अचानक चीन सरकारने झेंगझौ शहरात लॉकडाऊन घोषित केला. तत्काळ प्रभावाने लागू झालेल्या या लॉकडाऊनमुळे कोणाला कुठेही जाण्या-येण्याची परवानगी नव्हती. यामुळे वांगला त्या तरुणाच्या घरीच थांबणे भाग पडले.
वांगने शांघायच्या द पेपरला ही मुलाखत दिली आहे. नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ती दुसऱ्या शहरातून आल्याने तिच्याकडे लॉकडाऊन लागल्यानंतर दुसरा काहीच पर्याय नव्हता. यामुळे तिला त्या मुलासोबतच त्याच्या घरात रहावे लागले. वांगने या सर्व दिवसांचे काही छोटे व्हिडिओही बनवले आहेत. यामध्ये त्याने ती व्यक्ती त्याच्यासाठी जेवण कसे बनविते हे दाखवले. तो घरकाम करतो आणि जेव्हा वांग झोपते तेव्हा तो त्याचा लॅपटॉप घेतो आणि ऑफिसचे काम करतो, असे तिने म्हटले आहे.
वांगने सांगितले की ती लग्नासाठी असा मुलगा शोधत आहे जो तिच्याशी खूप बोलेल. पण हा माणूस फार कमी बोलतो. वांग म्हणते, "तो चांगले जेवण बनवितो. पण त्याला स्वयंपाकाची खूप आवड आहे. आणि हेच मला त्याच्याबद्दल खूप आवडले.