टोकियो- पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या जपानच्या दौ-यावर आहेत. भारत-जपानदरम्यान 13व्या वार्षिक संमेलनात सहभागी होण्यासाठी नरेंद्र मोदी टोकियोमध्ये दाखल झाले आहेत. मोदी आणि जपानच्या पंतप्रधानांमध्ये दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सप्टेंबर 2014ला जपानला पहिल्यांदा भेट दिली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानचे पंतप्रधान शिंजो आबेंबरोबर 12वी बैठक करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी टोकियोतल्या भारतीय समुदायातील लोकांच्या एका कार्यक्रमात पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी जपानमधील भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित केलं. दिवाळीच्या दिवसांत ज्याप्रमाणे दिवा सगळीकडे प्रकाश पसरवत असतो. त्याच पद्धतीनं तुम्ही जगभरात भारताचा नावलौकिक वाढवा, याच माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. देश मोठ्या बदलांना सामोरा जात आहे.
जगात जिथेही जाल तिथे दिव्यासारखा प्रकाश पसरवा- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 7:33 AM