इस्लामाबाद-
भारत काश्मिरी जनतेवर अत्याचार करत आहे, येथील लष्कर निरपराधांचे रक्त सांडत आहे, असे अनेक आरोप पाकिस्तान सरकारकडून भारतावर प्रत्येक वेळी केले जातात. संयुक्त राष्ट्र असो वा अन्य कोणतंही व्यासपीठ, पाकिस्तान आपली सवय सोडत नाही. पण आता एक यूट्यूब व्हिडिओ पाकिस्तान सरकारचा खोटारडेपणा उघड करत आहे.
दोन पाकिस्तानी यूट्यूबर्सनी काश्मीर जवळून पाहिलं आणि इथलं सामान्य जनजीवन पाहिल्यानंतर त्यांना कळलं की सरकार किती खोटं बोलतंय. पाकिस्तानच्या शहाबाज सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी या व्हिडिओतून झाला आहे. पाकिस्तान सरकार नेहमीच काश्मीरबाबत भारताविरुद्ध अपप्रचार किंवा चुकीची माहिती देत आहे.
भावूक झाले यू-ट्यूबरकाश्मीरमध्ये काय पाहिलं? यावर मिळालेल्या उत्तरावर विश्वास ठेवला तर, खोऱ्यातील परिस्थिती पाहून एक यूट्यूबर खूप भावूक झाला होता. हे YouTubers नियंत्रण रेषेवर (एलओसी) उभे राहिले आणि त्यांनी जम्मू आणि काश्मीरचा भारताचा भाग पाहिला. आणखी एक YouTuber म्हणाला की तुमचा विश्वास बसणार नाही की जेव्हा आम्ही समोर पाहिले तेव्हा खूप विकास झालेला दिसला. अगदी 4G आणि 5G टॉवर्स बसवले आहेत आणि त्यावरून काश्मीरमध्ये खूप विकास होत आहे हे समजतं.
मुलं बिनधानस्तपणे खेळत आहेतयूट्यूबर्स व्हिडिओत म्हणतात अशा छान गाड्या आणि अशी सुंदर घरं बघायला मिळाली. मशिदीतून अजानचा आवाज ऐकू येत होता. लोक नमाजासाठी मशिदीतही जात होते. इथून तुम्ही अंदाज लावू शकता की ज्या गोष्टी प्रसारमाध्यमांद्वारे सांगितल्या जातात, प्रत्यक्षात परिस्थिती अगदी उलट आहे. युट्युबर्सच्या म्हणण्यानुसार, मुलं घराबाहेर खेळत होती, वाहनं सहज येत-जात होती आणि लोकही त्यांच्या घराबाहेर बिनधास्तपणे फिरत होते. या यूट्युबर्सच्या मते, त्यांना नेहमी एवढंच सांगितलं जाते की, भारताचा भाग असलेल्या काश्मीरमध्ये गोळीबार होत आहे. असं असतं तर लोक इतक्या सहजतेनं फिरण्याऐवजी आपापल्या घरातच राहिले असते.
भारताच्या अखत्यारितील काश्मीरमध्ये स्वस्त वीजYouTubers च्या म्हणण्यानुसार, त्यांनी मशिदीपासून शाळा आणि विद्यापीठांपर्यंत सर्व गोष्टींना भेट दिली. नियंत्रण रेषेच्या पलीकडे भारताचा मोठा तिरंगा फडकत होता. हा तिरंगा पाहून ते आश्चर्यचकित झाले. त्यानंतर त्यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या काश्मीरमध्ये म्हणजेच पीओकेमध्ये ३५ रुपये प्रति युनिटने वीज मिळते. दुसरीकडे, भारताच्या जम्मू-काश्मीरमध्ये वीज अवघ्या १.५९ रुपये प्रति युनिट दराने उपलब्ध आहे.