क्वालालंपूर - गेल्या काही दिवसांपूर्वी इस्लामवर वादग्रस्त वक्तव्य केल्यावरून फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रॉन यांचा जगभरातील इस्लामिक देशांत विरोध होत आहे. मॅक्रॉन यांच्यावर मोहम्मद पैगंबरांच्या आक्रामक कार्टून्सचे समर्थन करण्याचा आणि जाणूनबुजून मुस्लीम धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात येत आहे. पॅरिसमध्ये एका शिक्षकाच्या हत्येनंतर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रॉन यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुस्लीम देशांत फ्रान्सविरोधात संतापाले आहेत.
आता अनेक जण मॅक्रॉन यांच्या विरोधाचा फायदा घेताना दिसत आहेत. तसेच आपला अजेंडा राबवत आहेत. वादग्रस्त इस्लामिक प्रचारक झाकिर नाईकने मॅक्रॉन यांचे नाव न घेता प्रक्षोत्रक आणि वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'अल्लाहच्या मानसाला शिवी देणाऱ्यांना वेदनादायक शिक्षा मिळेल,' असे नाईकने म्हटले आहे.
नाईकने फेसबुक पोस्टवर लिहिले आहे, 'अल्लाहच्या दूताला शिवी देणाऱ्यांना वेदनादायक शिक्षा मिळेल.' झाकीर नाईकने यापूर्वीही अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. काही दिवसांपूर्वीच, झाकीर नाईकने भारतीयांविरोधात गरळ ओकली होती आणि पैगंबर मोहम्मदांवर टीका करणाऱ्या भारतातील मुस्लिमेतरांना मुस्लीम देशांनी जेलमध्ये टाकायला हवे, असे म्हटले होते. एवढेच नाही, तर पैगंबरांवर टीका करणाऱ्यांत अधिकांश लोक हे भाजपचे भक्त आहेत. याशिवाय झाकीरने फ्रान्सच्या वस्तूंवरही बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. झाकीर नाईक सध्या मलेशियात आहे.
अगदी अशाच पद्धतीचे वादग्रस्त वक्तव्य मलेशियाचे माजी पंतप्रधान महातिर यांनीही केले आहे. त्यांनी गुरुवारी झालेल्या नीस हल्ल्यानंतर एक ब्लॉग पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी फ्रान्सविरोधात अत्यंत प्रक्षोभक शाष्य केले आहे. 'इतरांचा सन्मान करा' या नावाने लिहिण्यात आलेल्या या ब्लॉगमध्ये महातिर यांनी नीस हल्ल्याचा थेट उल्लेख केलेला नाही. महातिर यांनी ट्विटरवर एका पाठोपाठ एक, असे एकूण 14 ट्विट केले आहेत. यात त्यांनी मुसलमानांसोबत भेदभाव होत असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर फ्रान्सने पूर्वी मुसलमानांवर जे अत्याचार केले, त्यासाठी मुसलमानांना फ्रान्सच्या लाखो नागरिकांची कत्तल करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे मोहम्मद यांनी म्हटले आहे.
महम्मद यांनी, चेचन्याई विद्यार्थ्याने फ्रेंच शिक्षक सॅमुअल पेटच्या हत्येचा उल्लेख करत लहिले, "मुस्लिमांना रागावण्याचा अधिकार आहे. पूर्वी केल्या गेलेल्या नरसंहारासाठी फ्रन्सच्या लाखो नागरिकांना मारण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. मात्र, अद्याप मुस्लीम 'डोळ्याच्या बदल्यात डोळ्या'कडे वळलेले नाहीत. फ्रान्सने आपल्या नागरिकांना दुसऱ्याच्या भावनांचा विचार करण्याची शिकवण द्यायला हवी"
Nice Attack: हातात कुराण अन् चाकू घेऊन चर्चमध्ये घुसला हल्लेखोर; ३ जणांना केलं ठार
...म्हणून सुरू झाला वाद -पॅरीसमध्ये एका शिक्षकाच्या हत्येपासून हा वाद सुरू झाला. या शिक्षकाने पैगंबर मोहम्मद यांचे कार्टून आपल्या विद्यार्थ्यांना दाखवले होते. यानंतर त्या शिक्षकाची गळा कापून हत्या करण्यात आली होती. तर गुरुवारी फ्रान्सच्या नीस येथील चर्चमध्ये हल्लेखोराने चाकूने केलेल्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला. तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या खुलाशानुसार, संबंधित हल्लेखोर ट्यूनीशियाचा नागरिक असल्याचे समोर आले आहे. हा हल्लेखोर फ्रान्सच्या चर्चमध्ये कुराणची प्रत आणि चाकू घेऊन घुसला होता. गेल्या दोन महिन्यातील फ्रान्समधील हा तिसरा हल्ला आहे.