युवा उद्योजिका आसमा सय्यद आणि निलेश पवार संचालित "जमीन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची घोडदौड सुरूच आहे. मानाच्या विविध पुरस्कारांवर कंपनीने नाव कोरले असून महामुंबई पट्ट्यात जमीन खरेदी विक्री व्यवसायातील एक विश्वासार्ह कंपनी असा नावलौकिक कंपनीने प्रस्थापित केला आहे. जमीन खरेदी विक्रीबरोबरच नवनव्या संकल्पना कंपनीकडून आणल्या जात असून त्यांनाही ग्राहकांची विशेष पसंती मिळत आहे. शिवडी न्हावा शेवा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाच्या कामकाजाची नुकतीच पाहणी केली. हा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प लवकरच जनतेच्या सेवेत रुजू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. प्रकल्पाचे काम ९० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले असून अवघ्या काही महिन्यात त्यावरून वाहतूक सुरु करण्यात येईल. "अटल सेतू" असे त्याचे नामकरण करण्यास राज्याच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबईतील शिवडी येथून अवघ्या वीस मिनिटांत चिरले येथे समावेश आहे. पोहोचता येणार आहे. राज्यातील पायाभूत सुविधांचा विचार करता हा प्रकल्प गेमचेंजर प्रकल्पांपैकी एक ठरणार आहे. कारण दक्षिण मुंबईतून पूर्व द्रुतगती महामार्गाने नवी मुंबईतून पनवेल उरण परिसरात तब्बल अडीच तीन तासांनी येणारी वाहने काही मिनिटात पोहोचू शकतील. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महामुंबई परिसरातील जमीन खरेदी विक्री व्यवसायाचा चेहरामोहराच बदलून जाणार आहे. आणि विशेष म्हणजे जमीन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी महामुंबई परिसरात सर्वाधिक चांगले पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
द्रोणागिरी, बामणडोंगरी, खारकोपर अशा परिसराबरोबरच पनवेल परिसरात जमीन प्रायव्हेट लिमिटेड हे नाव आज सर्वतोमुखी झाले आहे. पनवेल परिसरात बंगलो स्कीम कंपनीकडून राबविण्यात येत आहे. फक्त व्यवहार नाही... गुंतवणुकीचे मार्गदर्शन सुध्दा !! जमीन खरेदी हा अधिक नफ्याचा व्यवसाय असल्यामुळे या क्षेत्रातील व्यावसायिक फक्त व्यवहाराकडे लक्ष देतात. ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करण्याकडे त्यांचा कल खूपच कमी असतो. जमीन प्रायव्हेट लिमिटेड मात्र आपल्या ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करते, गुंतवणुकीचे सुयोग्य पर्याय सुचवते. फक्त नफा हाच उद्देश नाही तर समाधानी ग्राहक हा उद्देश जमीन प्रायव्हेट लिमिटेडचा आहे. म्हणूनच कंपनीचा ग्राहकवर्ग सातत्याने वाढत आहे. गुंतवणूकदारांना नवे पर्याय उपलब्ध करून देत असताना महिलांना प्राधान्य मिळावे यासाठी आसमा सय्यद आग्रही असतात. याच भूमिकेतून महिलेच्या नावावर सातबारा हा उपक्रम त्यांनी घेतला. कुटुंबातील महिलेच्या नावावर जमीन घेणाऱ्या ग्राहकांना सवलत दिली. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. प्लॉट, फ्लॅट तसेच बंगलो प्लॉट तसेच व्हिला बांधून देण्यासह अनेक पर्याय जमीन प्रायव्हेट लिमिटेड उपलब्ध करून देते. गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांना प्रत्यक्ष जमीन दाखवली जाते. आणि ग्राहकाचे संपूर्ण समाधान झाल्यानंतरच व्यवहार पूर्ण केला जातो.
विश्वासार्हता हेच गमक आज जमीन खरेदी विक्री व्यवहारांत जमीन प्रायव्हेट लिमिटेड हे नाणे खणखणीत वाजते आहे, ते कंपनीच्या विश्वासार्हतेमुळेच. महामुंबई परिसरात नव्याने जमीन खरेदीसाठी येणारा ग्राहक आज जमीन प्रायव्हेट लिमिटेडची पायरी सर्वात आधी चढतो, इतकी ही विश्वासार्हता आहे. काहीही झाले तरी आपली फसवणूक होणार नाही. ही जमीन प्रायव्हेट लिमिटेडच्या ग्राहकांची भावना असते. त्यामुळे रिपीट कस्टमर्स हे कंपनीचे वैशिष्ट्य ठरले आहे - आसमा सय्यद संचालिका, जमीन प्रायव्हेट लिमिटेड