"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 06:59 PM2024-10-07T18:59:47+5:302024-10-07T19:00:39+5:30

युद्ध एका महत्वाच्या टप्प्यावर पोहोचल्याचेही युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमिर झेलेंस्की यांनी म्हटले आहे...

zelensky said the war has reached a critical stage Ukraine targeted Russia's oil depot | "महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!

"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!

क्रिमियातील ज्या मुख्य तेल डेपोवरून रशियन सैन्याला युद्धासाठी ईंधनाचा पुरवठा होत होता, त्या तेल डेपोवर आपण सोमवारी हल्ला केल्याचा मोठा दावा युक्रेनच्या सैनिकांनी केला आहे. तसेच युद्ध एका महत्वाच्या टप्प्यावर पोहोचल्याचेही युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमिर झेलेंस्की यांनी म्हटले आहे.

रशियन सैन्याला होत होता ईंधनाचा पुरवठा -
युक्रेनच्या जनरल स्टाफने सोशल मीडियावर म्हटले आहे की, रशियाच्या कब्जात असलेल्या क्रिमियाच्या दक्षिणेकडील फियोदोसियामध्ये तेल डेपोतून रशियन सैन्याला ईंधनाचा पुरवठा होत होता. हा हल्ला रशियाची सैन्य शक्ती आणि आर्थिक क्षमता कमकुवत करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग होता.

ब्लॅक सीच्या किनाऱ्यावरील फियोदोसिया शहरात रशिनायने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी डेपोत आग लगल्याची सूचना दिली. मात्र याचे कारण सांगितले नाही. यातच, यूक्रेनने रशियाच्या महत्वाच्या भागांवर हल्ला करायला सुरवात केली आहे. 

युक्रेनने विकसित केले लांब पल्ल्याचे ड्रोन -
युक्रेनने लांब पल्ल्याचे ड्रोन विकसित केले आहेत. ज्यांनी तेल डिपो आणि रिफायनरींबरोबरच शस्त्रागारलाही निशाना बनवले.  रशियाची आपल्या अॅडव्हॉन्स लाइन युनिट्सपर्यंत पुरवठा करण्याची क्षमता कमी करणे, विशेषतः पूर्व डोनेस्तक प्रदेशात, हा युक्रेनचा उद्देश आहे. 

Web Title: zelensky said the war has reached a critical stage Ukraine targeted Russia's oil depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.