कोरोनाने (Corona Virus) जगात 2019 च्या अखेरीस हातपाय पसरवण्यास सुरुवात केली. चीन, युरोप, भारत, अमेरिका असे एकेक करून दीडशेच्या वर देशांना कोरोनाने विळख्यात घेतले आणि जगभरात कधी नव्हे ते लॉकडाऊन लागले. अशी परिस्थिती आली की हॉस्पिटल ऐवजी काही देशांमध्ये नवीन कब्रस्तान बनविण्याची तयारी सुरु झाली. इटलीने तर वृद्ध लोकांना मरण्यासाठी सोडून देत तरुण लोकांना वाचविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, याबरोबर काही असे देश होते ज्यांनी सक्तीने लॉकडाऊन करत कोरोना पसरण्यावर आळा घातला.
ब्रिटनलाही कोरोनाची मोठी झळ बसली. मात्र, ब्रिटनमधीलच एका छोट्या बेटाने कोरोनाला साधे कोणाला शिवू (Island With Zero Covid Cases) पण दिले नाही. संत हेलेना बेटावर (St Helena Island) आजवर एकाही व्यक्तीला कोरोना झालेला नाही. हे बेट 120 स्क्वेअर किलोमीटर भूभागावर पसरलेले आहे. साउथ अटलांटिक समुदातील या बेटावर 4500 लोकसंख्या राहते. हे बेट नेपोलियनमुळे ओळखले जाते. news.com.au नुसार याच बेटावर नेपोलियनचा 1821 मध्ये मृत्यू झाला होता.
या बेटावर कोरोनाच पोहोचला नसल्याने येथील लोकांना मास्क किंवा सोशल डिस्टन्सिंगची गरज भासत नाही. सुरक्षा म्हणून येथील लोक वेळोवेळी हात धुतात. कोरोनाचा एकही रुग्ण न सापडल्याने सध्या या बेटावर पर्यंटकांची रीघ लागलेली आहे. असे वाटते की जगभरात कोरोनाच पसरलेला नाही.
पर्यटकांसाठी कठोर नियमसंत हेलेना बेटावर येणाऱ्या पर्यटकांना मात्र 14 दिवसांसाठी एका दूर जागी असलेल्या ब्राडलेस कॅम्पवर क्वारंटाईन व्हावे लागते. हा कॅम्प विमानतळाच्या कर्मचाऱ्यांसाठी बनविण्यात आला होता. मात्र कोरोना सुरु होताच त्याचे क्वारंटाईन सेंटर बनविण्य़ात आले. पर्यटकांना 72 तासांतील कोरोना निगेटिव्हि रिपोर्ट येथे सादर करावा लागतो.