इस्लामाबाद- पाकिस्तानममध्ये क्रिकेटपटू इम्रान खानचा पक्ष सत्तेत येण्याची चिन्हे आहेत. मात्र यासर्व निकालांमध्ये भारतासाठी अत्यंत चांगली बातमी आली आहे ती म्हणजे हाफिज सईदच्या पक्षाच्या पराभवाची. पाकिस्तानात झालेल्या या निवडणुकीत हाफिजने मदत केलेल्या अल्लाहू अकबर तेहरीक पक्षाला एकही जागा मिळण्याची शक्यता दिसत नाही. 26-11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या हाफिजने मिल्ली मुस्लीम लिग नावाचा राजकीय पक्ष काढून निवडणुकांच्या मार्फत पाकिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याच्या पक्षाला मान्यता मिळाली नाही. त्यामुळे त्याने अल्लाहू अकबर तेहरीक पक्षाच्या माध्यमातून निवडणूकीत आपले उमेदवार ठिकठिकाणी उभे केले. यामध्ये त्याने नॅशनल असेम्ब्लीसाठी 80 व प्रांतिक विधानमंडळांसाठी 185 उमेदवार उभे केले होते. मात्र अल्लाहू अकबर तेहरिकच्या मूळ उमेदवारांनाही पाकिस्तानातील या निवडणुकांत जिंकणे दुरापास्त झाले आहे.
भारतासाठी पाकमधून खुशखबर; दहशतवादी हाफिज सईदच्या पक्षाला 'भोपळा'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 12:26 PM