शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

लैंगिक संबंधातून अमेरिकेत आला झिका व्हायरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2016 9:57 AM

अमेरिकेतील टेक्सास प्रांतात झिका व्हायरसची लागण झालेला पहिला रुग्ण आढळला आहे.

ऑनलाइन लोकमत 

वॉशिंग्टन, दि. ३ - अमेरिकेतील टेक्सास प्रांतात झिका व्हायरसची लागण झालेला पहिला रुग्ण आढळला आहे. डास चावल्यामुळे रुग्णाला झिका व्हायरसची लागण झालेली नसून, लैंगिक संबंधातून झिका व्हायरसची लागण झाल्याची माहिती टेक्सासच्या स्थानिक आरोग्य अधिका-यांनी दिली. 
झिका व्हायरसचा गंभीर धोका लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने आधीच आंतरराष्ट्रीय पब्लिक हेल्थ इमरजन्सी जाहीर केली आहे. झिका व्हायरसने बाधित असलेला संबंधित रुग्ण वेनेझुएला इथे गेला होता तिथून लैंगिक संबंधातून या रोगाची लागण झाली. या रुग्णाने दक्षिण  अमेरिकन देशांमध्ये प्रवास केलेला नाही अशी माहिती अमेरिकन आरोग्य अधिका-यांनी दिली. 
टेक्सासमध्ये डासांच्या चावण्यामधून हा रोग आलेला नाही असे अधिका-यांनी सांगितले. गर्भवती स्त्रियांना सर्वाधिक काळजी घेण्याची गरज आहे. कारण झिका व्हायरसमुळे गर्भात असलेल्या मुलाच्या मेंदूवर परिणाम होते. झिका व्हायरसमुळे ब्राझीलमध्ये ऑक्टोंबरपासून अनेक सदोष मुले जन्माला आली आहेत. लॅटिन अमेरिकेत हा रोग वेगाने पसरत असून, अफ्रिका आणि आशिया खंडालाही या आजारापासून धोका आहे.