ऑनलाइन लोकमत
कॅम्ब्रिज, दि. 26- फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्ग याला तब्बल 13 वर्षांनी डिग्री मिळाली आहे. गुरूवारी हार्वर्ड विद्यापीठामध्ये "डॉक्टर ऑफ लॉ" ही पदवी देऊन झकरबर्गचा सन्मान करण्यात आला.
2012 साली डॉक्टर ऑफ लॉसाठी प्रवेश घेतल्यानंतर दोन वर्षामध्ये झकरबर्गने कॉलेज सोडलं होतं. फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर काम करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ फेसबुकला विकसित करण्यासाठी काम केलं होतं. "डॉक्टर ऑफ लॉ"ची डिग्री मिळवण्याचं वचन मार्क झकरबर्ग यांने त्याच्या आईला दिलं होतं त्याचीच पूर्तता करण्यासाठी तो पुन्हा एकदा शिक्षणाकडे वळला होता. ‘आई, मी तुला नेहमी सांगायचो मी कधीतरी या विद्यापीठात येईन आणि पदवी घेईन. आज ते स्वप्न पूर्ण झालं’ असं म्हणत त्याने हार्वर्डमधल्या दीक्षांत सोहळ्याचा फोटो शेअर केला. हार्वर्डमधल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्याने या विद्यापीठातले अनेक किस्से सांगितले. ज्या हॉस्टेलमध्ये तो राहत होते तेथून फेसबुक लाईव्ह करून त्यांचा अनुभव शेअर केला आहे.
हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभात जुकर्सबर्ग त्यांनी तीस मिनीट भाषण केलं. "हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा माझी निवड करण्यात आली तेव्हा मला फार आनंद झाला होता. माझी निवड झाली आहे या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. पण माझी हार्वर्डमध्ये निवड होणं माझ्या आई-वडिलांसाठी अभिमानाची गोष्ट होती", असं जुकर्सबर्ग समारोपाच्या भाषणात म्हणाला आहे.