लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नाफेडने हमीभावाने खरेदी केलेल्या सोयाबीन, मूग उडिदाच्या दुसºया टप्यातील १ कोटी ३५ लाख ६९ हजार रुपये ८९१ शेतक-यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे.जिल्ह्यातील आठ हमीभाव केंद्रावर नाफेडकडून ८९१ शेतक-यां कडून उडीद, मूग, आणि सोयाबीनची खरेदी केली होती. मात्र वेळेत शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येत नसल्याने शेतक-यांत संताप होता. जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे खरिपाच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. असे असताना ८९२ शेतक-यांनी मूग, उडीद, आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री केली होती. उसनवारी आणि दुष्काळामुळे शेतक-याकडे खर्चासाठी पैसाच नसल्याने शेतकरी हैराण झाले होते. कारण शेतमाल खरेदी केल्यानंतर आठवड्याभरात रक्कम खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे नाफेड कडून सांगण्यात आले होते. मात्र दोन महिने होऊनही रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा होण्यास अडचणी येत होत्या. यामुळे जिल्हा मार्केटिंगच्या कार्यालयात शेतकरी चकरा मारत होते. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती बघता जिल्हा मार्केटिंग विभागाने पाठपुरावा करुन शनिवारी ८९१ शेतक-यांच्या बँक खात्यात १ कोटी ३५ लाख ६९ हजार ४९७ रुपये आॅनलाईन वर्ग केले आहे. ऐन दुष्काळात थकीत रक्कम मिळाल्याने शेतक-यांनी समाधान व्यक्त केले.२२६ शेतक-यांकडून ४४ लाख ४८ हजार किमतीच्या ७९४ क्विंटल उडदाची खरेदी करण्यात आली होती. ६२५ शेतक-यांकडून ११८२ क्विंटल मूग खरेदी केली होती. तर ३० शेतक-याकडून २५६ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली होती. ५ जानेवारीला सोयाबीनची तर ७ जानेवारीला मूग, उडदाची नाफेडने खरेदी बंद केली होती.हमीभावाने खरेदी केलेल्या शेतक-यांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली आहे. एक शेतकºयाची रक्कम तांत्रिक अडचणीमुळे रखडली आहे. शेतकºयांना काही अडचणी आल्यास त्यांनी जिल्हा मार्केटिंग विभागाशी संपर्क करावा.- गजानन मगरे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी
१ कोटी ३५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:28 AM