शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

दहा दिवसांत ६०० कोटी जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 11:56 PM

महाआघाडी शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत मागील १३ दिवसांत ९९ हजार ९२६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महाआघाडी शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत मागील १३ दिवसांत ९९ हजार ९२६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे, तर आधार प्रमाणीकरण केलेल्या ८८ हजार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर गत दहा दिवसांत तब्बल ६१५ कोटी रुपये जमा झाले आहेत.महाआघाडी शासनाने कर्जमुक्ती योजना जाहीर केल्यानंतर प्रारंभी जिल्ह्यातील १ लाख ९० हजार शेतक-यांना १२०० कोटी रूपयांचे कर्ज माफ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. शेतक-यांच्या कर्ज खात्याशी आधार प्रमाणिकरण केल्यानंतर शासकीय वेबसाईटवर १ लाख ८१ हजार ५६७ शेतक-यांची नावे अपलोड करण्यात आली. २४ फेब्रुवारी रोजी प्राथमिक यादी जाहीर झाली. यात घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी व जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी या दोन गावांमधील ११०२ कर्जखात्यांचा समावेश होता. तर २९ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या दुस-या यादीत जिल्ह्यातील ९४५ गावातील १ लाख २९ हजार ५६ शेतक-यांच्या नावाचा समावेश होता. याद्यांच्या प्रसिध्दीकरणानंतर आजवर ९९ हजार ९२६ शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण केले आहे. तर तब्बल ८८ हजारावर शेतक-यांच्या कर्जखात्यात ६१५ कोटी रूपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. यात राष्ट्रीयकृत ७४ हजार ४५९ कर्जखात्यावर ५८१ कोटी तर जिल्हा बँकेच्या जवळपास १४ हजार कर्जखात्यांवर जवळपास ३४ कोटी रूपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित शेतक-यांची रक्कमही जमा केली जाणार आहे.जिल्ह्यातून १५०० तक्रारीशासनाच्या कर्जमुक्ती योजनेत आधार प्रमाणीकरणाबाबत १५०० जणांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. यात आधार क्रमांक चुकीचा असणे, ठसे न उमटणे, मयत शेतक-यांचे वारस आदी तक्रारींचा समावेश आहे.मयतांच्या वारसांनी माहिती देण्याची गरजज्या शेतक-यांचे निधन झाले आहे आणि त्यांचे नाव कर्जमुक्ती यादीत आहे, अशा मयत शेतक-यांच्या वारसांनी संबंधित बँक अधिकारी किंवा तहसीलदारांकडे माहिती देण्याची गरज आहे. त्यानंतर बँक प्रशासनाकडून शासनाच्या पोर्टलवर माहिती भरेल. माहिती भरल्यानंतर त्या कर्जखात्याला कर्जमुक्त करण्याची प्रक्रिया शासनस्तरावरून करण्यात येणार आहे.४० हजार खात्यांचे प्रमाणीकरण शिल्लकशासनाच्या दोन याद्यांमधील शेतक-यांपैकी ९९ हजार ९२६ शेतकºयांनी आधार प्रमाणिकरण केले आहे. तर जवळपास ३० हजार शेतक-यांच्या कर्ज खात्याचे आधार प्रमाणिकरण शिल्लक आहे.संबंधित शेतक-यांनी हे आधार प्रमाणिकरण वेळेत करून घ्यावे. बाहेरगावी असलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या परिसरात असलेल्यांना आपलं सरकार केंद्रावरूनही आधार प्रमाणिकरण करता येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी