लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : उभ्या असलेल्या एका कारच्या समोरील दरवाजाची काच फोडून गाडीतील एक लाख रूपये व महत्वाच्या कागदपत्रांची बॅग चोरट्यांनी लंपास केली आहे. या प्रकरणी व्यापारी अवधूत कुलकर्णी यांच्या तक्रारी वरून भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली आहे.अवधूत अरूण कुलकर्णी (वय- २५, रा. उंडणगाव, ता. सिल्लोड) हे शनिवारी येथे कामानिमित्त आले होते. यावेळी दुपारी दीडच्या सुमारास त्यांनी कृषी बाजार समितीच्या व्यापारी संकुलाजवळील मैदानात कार क्र. (एमएच २०, सीएस ४६८१) उभी केली होती. यानंतर ते रजिस्ट्री आॅफिसमध्ये नातेवाईकांना भेटून परत आले. यावेळी त्यांना गाडीची काच फोडून चोरट्याने चालकाच्या बाजूच्या डिकीतून लॅपटॉपच्या बॅगेत असलेले एक लाख रूपये व महत्त्वाची कागदपत्रे पळविल्याचे लक्षात आले. या प्रकरणी अवधूत कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास जमादार बी. एल. राठोड करत आहेत.
कारची काच फोडून रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 12:53 AM